Bluepad | Bluepad
Bluepad
आकार
हेमंत
14th May, 2022

Share

“ माझा मुलगा/मुलगी माझ ऐकत नाही.”
“ आमचा कारटं फार नालायक आहे.”
“ आमच लेकरू फार वात्रट आहे.”
“ कधी कधी अस वाटत हॉस्पिटल वाल्यांनी बदली करून दिलं आहे.”
आजकालच्या ‘कथित वडिलांची’ ही तोंडावरची वाक्य ( आई शब्द लिहला नाही कारण स्त्री जात ही लेकरांबद्दल थोड्या पडत्या भूमिकेत असते आणि तिने तसच रहाव नाही तर चिमुकल्यांना ‘आगितून निंघले अन् फापूट्यात पल्ले’ अशी परिस्थिति भोगावी लागेल.)
    “ आयुष्याच्या सुरवातीचे ९ महीने ज्याने फक्त अंधारच बघितला असेल तो या प्रकाशात बघणार तरी काय? “ त्याला काय बघेच हे समजायला तर हवं ना? त्या तान्ह्या जीवाला एकच गोष्ट समजते की या जगत जर राहायच असेल त आपण अनुकरण करायला शिकायला हवं. मग तो आता अनुकरण करणार तरी कोणाचं? सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध असलेल्या लोकांच म्हणजे ‘आई आणि वडील’.
    भावी आयुष्यात आपण कस वागायला हवं हे मूलं वयाच्या ५व्या वर्षा पर्यंत चांगल शिकतात. वय वर्ष ५ सांगितलं आहे कारण एखादा जीव जर फक्त बघून आणि ऐकून आपली बोली भाषा शिकू शकतो तर तो आपल्या इतर सवयी नाही का शिकणार? आता लहान मुलाला काय समजतं? असा आपला सर्वसाधारण समज असतो, पण ते तस नसत खतरत लहान मुलांच आपल्या व्यवहारा कडे जरी लक्ष नसल तरी त्यांच्यावर आपल्या वागण्याचा व बोलण्याचा परिणाम होत असतो. मूलं ५ वर्षा नंतरही शिकतात पण ते शिक्षण काही त्यांचा मूळ स्वभाव बनू शकत नाही. कारण आपली मूलं ५ वर्षा पर्यंत जे काही अंगिकारतील तो मूलभूत आधार समजून ते पुढे जाऊन वागतील. मग आता त्यांना काही न शिकवता ते शिकतात तरी कसे? याचं उत्तर एकदम सोप आहे , जस माकडाचा माणूस झाला तसेच.
    काही पालक सुरक्षेच्या उच्चतम स्तरावर असतात आपल्या पाल्याने चुकीचे पाऊल उचलू नये किंवा त्याला काही इजा होऊ नये याची खात्री ते पुरे पुर घेतात. पण आपण ही गोष्ट करतांना एक महत्वाची गोष्ट विसरतो की ‘ आपण चिरंजीवी आहोत का?, आपण आपल्या पाल्याला त्याच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत साथ देणार आहोत का? ‘ तुम्ही आहात तो पर्यंत तो चुकणार नाही याची खत्री आपण करू शकतो पण आपल्या नंतर काय? याचा ही विचार आपण करायला हवा.
    आपल्याला जर कोणी प्रश्न केला की “ तुमच्या जीवनातील अशी एक व्यक्ति कोण की जीने एखादी गोष्ट ठरवली तर तुम्ही सहज पणे करू शकाल? “ आपण एकाही क्षणाचा विलंब न लावता सांगतो की “ माझ्या आयुष्यातील ती व्यक्ति मीच आहे” , मग ही गोष्ट आपण आपली विचारधारा मुलांवर थोपवतांना का विचारात आणत नाहीत? आपल्या मुलांच्या आयुष्यातला तो व्यक्ति बनण्याचा प्रयत्न आपण का करत असतो?
    कृष्णनीती प्रमाणे “ आपण आपल्या मुलांच फक्त चरित्र घडऊ शकतो त्यांच भविष्य नाही “. मग आपला ओढा त्यांच्या चारित्र्या पेक्षा त्यांच्या भविष्यकडे का असावा?
    लेखाचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांना वाईट मार्ग दाखवत आहात पण वाईट जरी नसला तरी तो चांगलाच आहे अस पण नाही ना? कोणतेच आई वडील आपल्या पाल्याचं नुकसान व्हाव असा विचार करत नाहीत पण जरी आपण त्यांच नुकसान करत नसलो तरी त्यांचा फायदाच होतो आहे अस कशावरून? आपल्याला वाटत म्हणून?
    आपली मूलं जर काही चुकत असतील तर आपण त्याच्या मुळाशी जायला हवं , कारण मारून झोडून प्रश्न तात्पुरती सुटतात कायमचे नाही.
“ लहान मुलगा म्हणजे मातीचा गोळा , आकार द्यावा तशी मूर्ती घडते!!” आणि मूलं कितीही मोठी झाली तरी ती आई वाडिलांसाठी लहानच असतात. 

173 

Share


Written by
हेमंत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad