Bluepad | Bluepad
Bluepad
कर्ज फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते?
O
Omkar Nayak
14th May, 2022

Share

कधी शिक्षणासाठी किंवा घरासाठी, गाडीसाठी, व्यवसायासाठी अशा विविध कारणांसाठी आपण बँकेतून कर्ज काढतो. पण काही लोकं बँकेचे हप्ते भरत नाहीत. बँकेचं लोन फेडलं नसेल तर बँक काय कारवाई करते जाणून घेऊया आजच्या लेखात.
बँक आपल्याला दोन प्रकारचे कर्ज देते. सुरक्षित कर्ज आणि दुसरं म्हणजे असुरक्षित कर्ज.
● सुरक्षित कर्ज
यामध्ये आपल्याला गोल्ड लोन, एफ डी लोन, कार लोन, होम लोन असे सुरक्षित कर्जाचे पर्याय देते. या प्रकारातील होम लोनसाठी आपलं घर हे पूर्णपणे बँकेच्या हवाली केलं जातं. त्यावर बँकेचा अधिकार निर्माण होतो. कर्ज घेतल्यानंतर त्यावर बँकेचा दागिन्यांवरही अधिकार निर्माण होतो.

● असुरक्षित कर्जामध्ये मुख्यत्वे खासगी कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेतलं जातं. हे कर्ज सुरक्षित कर्जापेक्षा कमी रकमेवर आकारलेलं असतं.
तर या दोन्ही कर्जापैकी आपण घेतलेलं कर्ज कोणत्या प्रकारात मोडतं हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं.

बँक काय करते ?
बँक आपल्याला या दोन्ही प्रकारात हप्ते भरुन आपल्यावरील कर्ज पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी देते. त्या कालावधीत आपण दरमहा ठराविक रक्कम भरून ते कर्ज फेडू शकतो. वेळेत कर्ज भरलं की वरचा दंड ही बँक आकारात नाही आणि आपलं कर्जाचं खातं कायमचं बंद होतं. जर आपण कर्जाचे हप्ते त्या कालावधीत भरत नसू तर सुरुवातीला बँकेकडून कर्जाच्या रकमेनुसार एक,दोन किंवा साधारण तीन महिन्यांची सवलत दिली जाते. त्यात आपल्याला कर्ज फेडावं लागतं. मात्र त्यानंतर ही आपण कर्ज फेडलं नाही तर बँकेकडून आपल्याला फोन करुन आपल्या कर्जाची माहिती दिली जाते. लवकरात लवकर हफ्ते भरण्याविषयी सांगितलं जातं. बँकेकडून घरी नोटीसही पाठवली जाते. अनेकदा बँकेची माणसं देखील कर्ज वसुलीसाठी बँकेत पाठवली जातात. जर आपण कर्ज भरण्यास टाळाटाळ करत असल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं किंवा आपल्यावर वसुलीसाठी आलेल्या व्यक्तींना संशय निर्माण झाला तर आपल्याला पोलीस कोठडीही दाखवली जाते.

आपण कर्जाच्या सुरक्षित प्रकारात मोडत असू तर बँक सिबील कंपनीला आपल्या नावे रिपोर्ट करते. सिबील कंपनीचं कार्य म्हणजे ही कंपनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक हालचालींची वेळोवेळी नोंद ठेवणे. त्यामुळे आपण कर्ज न भरण्याची कोणतीही खोटी कारणं देऊ शकत नाही. ही कंपनी तिच्या पूर्ण अधिकाराने आपल्या इतर बँकेतील रकमेवर ताबा धरू शकते.

 कर्ज फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते?

जेव्हा आपण बँकेत कर्ज काढण्यासाठी जातो तेव्हाच बँक आपली ही सगळी माहिती सिबीलकडून तपासून घेते त्यामुळे जर यावेळेस आपण कर्ज भरलं नाही तर कंपनीद्वारे आपला सिबील रिपोर्ट खराब आहे असं नमूद होतं आणि आपल्याला पुढे कधीही कोणत्याही बाबतीत कुठलीही बँक कर्ज देत नाही. आपल्या रिपोर्टमध्ये आपला कर्जाचा स्कोर दिलेला असतो तो जर ७४० पेक्षा कमी असेल तर आपल्याला कुठेही कर्ज काढता येत नाही. त्यानंतर बँक आपल्याला दिलेलं कर्ज वसूल करण्यासाठी आपण तारण ठेवलेले दागिने, घर विकून आपलं कर्ज पूर्ण भरून काढते.

आपण काय करू शकतो?
अनेकदा बँकेकडून तीन महिन्यांची सवलत देऊनही आर्थिक अडचणीमुळे आपल्याला कर्ज भरणं शक्य नसतं मग अशावेळी आपल्यावर पुढची कारवाई होऊ नये आणि बँकेलाही आपली अडचण कळावी म्हणून आपण बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे आपली बाजू मांडू शकतो किंवा लिखित स्वरूपात अर्ज करून आपली कर्जाची सवलत वाढवून घेऊ शकतो.

कर्ज काढण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
लोक आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून बँकेकडून कर्ज काढतात मात्र कर्ज काढण्या आधीचं आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.
● आपण कर्ज कसं फेडू शकतो याचा विचार करावा.
● कर्ज काढताना कधीही आपलं कर्ज हे आपल्या पगाराच्या ४०% पेक्षा अधिक नसावं.
● कर्ज काढताना ते जास्तीतजास्त डाऊन पेमेंटवर असावं.
● कर्ज भरताना एवढा मोठा हप्ता भरता येत नाही असं वाटल्यास आपण हप्त्याची रक्कम कमी करून घेऊ शकतो.
● कर्जासाठी इतर सुरक्षित मार्ग असतील तर तेही पहा.
तर तुम्ही कर्ज काढलं असेल तर वेळीच ते भरण्याचा प्रयत्न करा म्हणजे बँकेच्या कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवरालाही याविषयी माहिती देण्यासाठी हा लेख पाठवा.

516 

Share


O
Written by
Omkar Nayak

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad