उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली, "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी अवस्था आणि असा हा उन्हाळा!!!!!उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली, "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी अवस्था आणि असा हा उन्हाळा!!!!!
कडक उन्हाळा माणसाला जीव नकोसा करून टाकतो.अरे आपला शेतकरी राजा ढगाकडे डोळे लावून बसलेला असतो .रखरखत्या उन्हात काम करत असतो,असल्या या उन्हाचा त्याला रागही येत असतो आणि आनंदही होत असतो .अशी कित्येक ठिकाणी आहेत जी कि ,उन्हाळा कंटाळलेली आहेत आणि पावसाला हाक मारत आहेत.उन्हाळ्यामुळे पिके वाळतात, विहिरी आठवतात,नदी व नाले ओसाड पडतात हे सर्व काही पाहता माणसाला तोंडातुन शब्द फुटत नाही.माणुस एकसारखा पावसाची वाट बघत असतो ,माणुस करुतरी काय शकतो अश्या या उन्हाला...
नको हा उन्हाळा , नको हा उन्हाळा.
वृक्षारोपणाचा संपला हा जिव्हाळा.
तप्त घरे तप्त वारे, उष्माघाताने निष्पाप बळी सारे.
बंद वारा वाढतो पारा, अंगातुन निघतात घामाच्या धारा.
आजही शोधतो खरा, वाटसरू वृक्ष तारेचा साहारा.
मग हवा हवा वाटेल उन्हाळा.
मानवतेचा खरा ठरेल जिव्हाळा.