कारणे शोधत राहिलो,
आवडत्या गोष्टी शोधताना,
महत्त्वाच्या गोष्टींना हरवत गेलो!
व्यक्त होण्याच्या पाठीमागे धावताना,
स्वप्नांची राखरांगोळी करत गेलो,
अडकत गेलो, फसत गेलो,
आभासी दुनियेच्या आहारी जाऊन,
स्वतःला, स्वप्नांना, भविष्याला, आयुष्याला
विसरून गेलो!
लिहित गेलो,
न जाणवलेल्या वेदनादायी भावनांनी डायरीची कोरी पाने रंगवत गेलो,
हातातले क्षण निसटत राहिले आणि महत्त्वाच्या गोष्टींना हरवताना, त्या गोष्टी निसटताना,
फक्त पाहत राहिलो!
भास, आभास, अस्तित्व, मृगजळ, तत्त्वज्ञान आणि
विचारांची पराकाष्ठा करत राहिलो,
उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना,
फक्त स्वप्नातच न्याहाळत राहिलो,
स्वप्नातच त्यांना जगलो, अनुभवलो, योजिलो!
आणि महत्त्वाच्या गोष्टींना हरवत गेलो!
धावलो, खेळलो, संगीतमय झालो,
प्रेरित करून स्वतःला, प्रेरणेच्या आहारी गेलो,
प्रेरणेने पुन्हा लिहीलो, धावलो, खेळलो, संगीतमय झालो!
निघून चाललेल्या वेळेबरोबर,
त्या महत्त्वाच्या गोष्टींना निघताना फक्त पाहत राहिलो!
कारणे शोधत राहिलो,
आवडत्या गोष्टी शोधताना,
महत्त्वाच्या गोष्टींना हरवत गेलो!
- मनच!