Bluepad | Bluepad
Bluepad
उन्हं आलंय माझ्या अंगात
प्रतिभा
14th May, 2022

Share

त्यादिवशी निखिल घरी आला तोच डोक्यात राख घालून खूप संताप खुपच राग भरला होता त्याच्या डोक्यात.
मग काय सर्वांवर आग पाखडणे चालू झाले.
पण मजा म्हणजे आम्ही सर्वच गप्प होतो
निमूटपणे त्याचे रागीट शब्द झेलत होतो
पण ते ही त्याला सहन झाले नाही व काहीतरी बरळला.
उन्हं आलंय माझ्या अंगात.असेच काहीसे
आम्ही सर्व हसू रोखू शकलो नाही.
त्याला माठातले वाळा घातलेले थंड पाणी दिले बरोबर थोडा गुळ.
हळूहळू थोडाच शांत झाला.
मग आई म्हणाली निखिल आंघोळ करून घेतोस का.थोडा फ्रेश हो.
मग निखिल ची स्वारी अंघोळीला गेली.
आईने आंघोळीच्या पाण्यात थोडी चंदन पावडर टाकली होती
पाण्याला मंद सुगंध होता.
आता मात्र निखिल थंडावला.त्याला आता भूक लागलीच असेल पण असे संध्याकाळी मध्येच काही खाल्ले तर जेवणार काय
म्हणून आईने त्याला थंड नाचणीची आंबील दिली .
आणि नंतर श्र्वेताला म्हणजेच निखिलच्या बायकोला सांगितले की जा त्याचे तळवे तुपाने काशाच्या वाटीने घास.
निखिल आता नॉर्मल झाला होता.
आता तोच म्हणाला श्वेता अग नंतर थोडे तूप डोक्याला पण घास हां
मी का चिडलो माहीत नाही मगाशी पण
या उन्हाच्या गर्मिने माझा पारा चढतो हल्ली.
तो चिकचिकाट नकोसा वाटतो.
खर तर मलाच माहीत नाही असे काय झाले मी चिडलो
ही उन्हं मात्र अंगात शिरतात थबथबून घाम चिकटला की नको नको वाटते
त्यात पाणी पण संपले माझे. घसा तहानलेला
पोटातली आग डोक्यात
उन्हं अंगात च नाही तर पहिली डोक्यात जातात.
नकोच तो उन्हाळा.
  • प्रतिभा बोर्डे

184 

Share


Written by
प्रतिभा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad