Bluepad | Bluepad
Bluepad
ग्रीष्मातील पुष्पवृष्टी
उमेश महादेव तोडकर
उमेश महादेव तोडकर
14th May, 2022

Share

ग्रीष्मातील पुष्पवृष्टी
सुर्य तळपला धरणी तापली
उन्हाळ्याची चाहूल लागली
ओसाड या माळरानावरती
झाडे रंगीबेरंगी फुलांनी बहरली
बहावा फुलला पिवळ्या फुलांनी
दीसतो जसा सोनेरी सोनेरी
वहाव्वा वहावा म्हणावे वाटते
सोनपिवळ्या पुष्पमालांना पाहूनी
गुलमोहर फुलला लाल नारंगी फुलांनी
त्याची सुंदर हीरवी नाजुक पालवी
शेंगा जश्या तलवारीवाणी
परीसर करतात रंगीबेरंगी
निलमोहर फुलला निळ्या जांभळ्या फुलांनी
नवलाई सर्वत्र निळ्या जांभळ्या रंगांची
तप्त दाटल्या ग्रीष्मात वाटतो
गुलमोहर जसा निळ्या श्रीरंगावाणी
पांढ-या शुभ्र फुलांनी बहरला
सुंदर मोहक विलोभनीय चाफा
पाढ-या फुलास पिवळी कीनार घेवून
सुगंधीत करतो ग्रीष्मात हा चाफा
लालभडक फुलांनी पळस हा फुलला
दीसतो जसा वैशाखातील वनवा
उन्हात दिसतो पेटल्यासारखा अक्षरशः
उपयोग त्याचा होळीच्या रंगाला
मोगरा फुलला मोगरा फुलला
पहाटे अंगण सुगंधीत करायला
पांढ-या शुभ्र फुलांनी घेतली
माळण्या गज-यासव केसांची जागा
लालगर्द रंगांचे झुबके
फक्त मे महीन्यातच फुलते
रखरखत्या उन्हात सुद्धा
मे फ्लाँवर डौलाने झुलते
अशी ही ग्रीष्मातील पुष्पवृष्टी
तप्त उन्हात पुष्पवर्षाव करती
रंगीबेरंगी फुलांनी बहरली झाडे
हीच खरी निसर्गाची नवलाई

202 

Share


उमेश महादेव तोडकर
Written by
उमेश महादेव तोडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad