दिनांक:-१४/०५/२०२२
सजीव सृष्टी मध्ये परिसंस्थेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामध्ये यामध्ये सजीव आणि निर्जीव यांनी मिळून अन्नसाखळी तयार होते. अन्नसाखळी मध्ये पक्ष्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
पक्षा शिवाय अन्नसाखळी पूर्ण होत नाही. पक्षी हे अन्नसाखळीचे महत्त्वाचे घटक आहेत.
यामुळे या सृष्टीत पक्षी फार महत्त्वाचे ठरतात. पृथ्वीवरील जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी पक्षी असणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे स्त्रोत कमी झाल्यामुळे पक्ष्यांना प्यायला पाणी मिळत नाही करिता मानवानी पक्षी संवर्धनाचे कार्य करणे क्रमांक प्राप्त झालेले आहे. अन्नसाखळीतून फक्त पक्षी कमी झाले तर पृथ्वीवरील जैवविविधता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. पक्षी हेच जैवविविधत राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांसाठी पाणी मिळावे म्हणून पक्ष्यांची पाणपोई तयार करावे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळेल आणि त्यांचे जीवाचे रक्षण होईल. शहरी भागातील लोकांनी आपल्या घराच्या छतावर किंवा झाडावर पक्षांसाठी पानपोळी तयार करावी हीच काळाची गरज आहे तेव्हाच केव्हाच आपणास पक्षी दिसत राहतील. मग करांना पाणपोई राव. पाणपोई तयार करून जैवविविधता रक्षणासाठी हातभार लावा हाच संदेश यानिमित्ताने द्यावे असे वाटते. भविष्यकाळात जीवसृष्टी अबाधित राहावी म्हणून पक्षी संवर्धन करणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी आपापले योगदान देणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे पक्ष्यांची तस्करी थांबवणे गरजेचे आहे. काही वन माफीये पक्ष्यांची शिकार करतात आणि त्याचे मास विकतात किंवा पक्ष्यांच्या शरीराचे अवयव सुद्धा विकतात. यावर आळा घालणे अत्यावश्यक आहे. यासाठी गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. आपल्या देशात कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही त्यामुळे माफिया लोकांची भावते आणि ते वनसंपत्तीचा नाश करतात हे कुठेतरी थांबले पाहिजे. याकरता शासनाने ताबडतोब पावले उचलली पाहिजेत. वन माफियांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे तेव्हाच साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे सोपे जाईल. आपल्या देशात वन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वनमा फिये शिकार करतात. आपल्या देशात काही भ्रष्टाचारी अधिकारी कार्यरत आहेत असे अधिकारी माफी यांसोबत जुळवणी करून घेतात आणि वनसंपत्ती लुटतात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना कायद्यानुसार कडक शिक्षा केली पाहिजे तरच अशा अधिकाऱ्यांना जबर झटका पडेल आणि पर्यायाने नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन होईल. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन हीच काळाची गरज आहे.हे हे कार्य कोण्या एकट्याचे नाही या या कामाकरता सर्वांनी एकजुटीने कामाला लागणे गरजेचे आहे त्याशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकणार नाही. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्याने हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. यासाठी शासन , सामान्य नागरिक,शासकीय अधिकारी,आणि काही निवडक सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन हे हेकार्य पूर्णा केले पाहिजे. तेव्हाच भावी पिढीला सुदृढ अशी जैवविविधता पाहायला मिळेल यात शंका नाही.
साधारणपणे चैत्र मास सूरू झाला की , उन्हाळ्याची चाहूल लागते.पाणझड सुरू होते.वृक्षाची सर्व जुळणी पिने गळून पडतात.आणि वृक्ष बहरू लागतात.याच महिन्यात वसंत ऋतू ची सुरुवात होते. कोकिळेला कंठ फुटतो,नर कोकीळ गायला लागतो आपल्या मंजूळ वाणीतून आपल्या जोडीदाराला साद घालतो. वृक्षवल्ली फुलांनी बहरून जाते.जनु काही ही धरणी रंगीबेरंगी फुलांची साडी घालून नववधु सारखी नटली आहे , ऋतुराज वसंताच्या स्वागताला.वसंत ऋतुला ऋतुराज वसंत म्हटलं जातं कारणही तसंच आहे.या ऋतू च्या आगमनाने सारी सृष्टी बहरून जाते. जनुकांही वृक्षवल्ली डोक्यावर फूलांचे गुच्छ घेऊन वसंताच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत असा भास होतो.
उन्हाळ्यात बरेच वृक्षांना फुले येतात. आपल्या देशात सर्वत्र आढळणारे खालील वृक्ष उन्हाळ्याच्या दिवसांत फुलतात.
१) बहावाचे वृक्ष गर्द पिवळ्या फुलांनी बहरून येतो.
२) कुळ्याचे झाड तिनं प्रकार असते एक पांढरा कुळा,दुसरा काळा कुळा आणि तिसरा तांबडा कुळा .याला पांढरी फूले येतात.
३) गुलमोहोराला गर्द लाल-गुलिबी फुले येतात.
४) सोनमोहराला फिक्कट पिवळी, सोनेरी फुले येतात.
५) निलमोहराला गर्द निळी फुले येतात.
६) पळसाला लाल केशरी रंगाची फुले येतात.
७) पारिजातकाला लाल देठ असलेली छोटी-छोटी पांढरी फूले येतात.
८) मोहाच्या झाडाला पिवळसर रंगाची टप्पोरी फुलं येतात आणि ती पहाटे पासून टपटप खाली पडतात.गावकरी ती फूलं वचून आणतात आणि त्याना वाळवून ठेवतात.
९) काटेसावरीला लालभडक मोठी मोठी फुले येतात.
नंतर तीला बोंड येतात बोंड परिपक्व झाली की ते फुटतात आणि त्यातून कापुस असलेली बी बाहेर पडतात,ही हवेच्या झोतिबरोबर उडत जातात गावगाड्याकडे या उडणार्या बियांना म्हातारी म्हणतात. आम्ही लहानपणी या म्हातार्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत असु त्यावेळचा आनंद अवर्णनीय असा होता.
१०) याशिवाय घाणेरी,सोनचाफा, कौशी ,पितमोहर यांना सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात फले येतात. अशी अनेक वृक्ष की ज्यांचा नामौल्लेख झालेला नाही.अशा कितीतरी वृक्षांना या ऋतुत फुले येतात.
उन्हाळ्यात उन्हाच्या काहिलीने होणारी जळजळ, सर्व प्राणी मात्राना जाणवायला लागते.पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतांमधील पिढी आटतो.सर्व सृष्टीला पाणी टंचाईची जाणीव निर्माण होते. या दिवसात उन्हापासून आपल्याला त्रास होत असल्यामुळे तो नकोसा वाटतो. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात अनेक नैसर्गिक घटना घडतात की त्यामुळे सृष्टीचा कायापालट होतो.
मानवाची कितीही प्रगती झाली तरि तो निसर्गाचे सर्व रहस्य उलगडू शकणार नाही. नैसर्गिक घटना ह्या निसर्ग नियमानुसार घडतात.यावर मानवाचं नियंत्रण चालू शकत नाही. नवनिर्मिती हा सृष्टीचा नियम आहे. उन्हाळ्यात खर्या अर्थाने नवनिर्मिती ला सुरूवात होते.म्हणूनच यया ऋतुराज सृजनात्मक उन्हाळा असे म्हणतात.
निसर्गनियमानुसार बीयांपासून वृक्ष होतात. वृक्षांची पुर्ण वाढ झाली की. त्याला फुले येतात आणि फुलांपासून बीया तयार होतात. उन्हाळ्यात वृक्षांना फुले येतात व बी तयार होतो याचाच अर्थ की, उन्हाळा हा नवनिर्मिती करणारा ऋतू आहे.
बहुतेक भारतीय पक्ष्यांचा विनीचा हंगाम उन्हाळ्याच्या शेवटी सुरू होतो.पक्षी आपापला जोडीदार निवडतात.निवड झाल्यानंतर नर आणि मादी दोघेही मिळून घरटे बांधतात.
मादीला घरटं आवडलं नाही तर ती घरटं तोडून टाकते नंतर दोघेही मिळून पुन्हा घरटी बांधतात.मादी त्या घरट्यात अंडी घालते आणि दोघेही मिळून अंडी उबवतात .
२० ते २५ दिवसांनंतर त्या अंड्यातून गोजीरवानी पिल्लू बाहेर पडतात.अशाप्रकारे नवीन पिढी जन्माला येते.
नवनिर्मिती हा निसर्गाचा नियम या उन्हाळ्यातच सूरू होते म्हणून उन्हाळ्याला सृजनात्मक उन्हाळा असे म्हटले जाते.
पाच सहा वर्षापूर्वी ची गोष्ट.आमच्या घरच्या परसबागेत मोरपंखी चे झाड होते. या झाडावर बुलबुल पक्षांनी घरटे तयार केले होते.
उन खूपच होते त्यामुळे आमच्या श्रीमती प मी क्ष्च कयन घरट्यावर कापडाचे पांघरून घातले.
बुलबल पक्षी नर आणि मादी आळीपाळीने अंडी उगवत होती. 15 ते 20 दिवसांनंतर अंड्यातून पिल्लू बाहेर आले. छोटी छोटी गोजिरवाणी पक्ष्यांची पिल्ले आम्ही दररोज सकाळी पाहत होतो. हे बुलबुल पक्षी सुरुवातीला आम्ही जवळ गेल्यावर चीन चिऊ ची वाट चीाट वहिवाट क करत होतीाही दिवसांनी त्यांना आमची सवय झाली. त्यांनी ओरडणे बंद केले. अशाप्रकारे आमची या बुलबुल पक्षांबरोबर जवळीक निर्माण झाली.ते ते आमच्या सोबत संवाद साधू लागले. आम्हाला ही त्यांची भाषा करू लागली, त्यांना काय हवं. काय नाही, हे आम्हाला समजू लागले. जवळपास पंधरा-वीस दिवसांनी या पक्ष्यांच्या पिल्लांना पंख दिसू लागले.
नर आणि मादी बुलबुल पिल्लांसाठी चोचीत दाणा आणून पिलांना भरवायचे तो प्रसंग खरंच अवर्णनीय असाच होता. आता जून महिना संपत आला होता. रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली. पावसाळ्याची चाहूल लागली. आतापर्यंत सर्व काही ठीक होतं.
एके दिवशी रात्री वादळ वारा आणि सोबत जोरदार पाऊस पडला. या वादळामुळे बरेच नुकसान झाले होते. आम्ही सकाळी उठून पाहिलं तेव्हा त्यातला एक पिल्लू खाली पडला होता. तो मेला होता. ते पाहून बुलबुल नर-मादी केविलवाणी ओरडत होती. त्यांचे ते केविलवाणी ओरडणे खूपच दुःखदायक होते. आम्हालाही या प्रसंगाच्या निमित्ताने खूप खूप वाईट वाटले कारण आता हे बुलबुल नर-मादी आणि त्यांची पिल्ले आमच्या कुटुंबाचे घटक झाले होते. आता घरट्यात एकच पिल्लू होते. त्याचे भरण-पोषण बुलबुल नर मादी करत होते. यानंतर पंधराएक दिवसांनी फि पिल्याला पंख फुटले. एके दिवशी सकाळी या पिल्लांनी घरट्यातून उडी घेतली आणि तो खाली उडाला. बुलबुल नर-मादी त्याला उडण्याचे प्रशिक्षण देत होते. हळूहळू तो पिल्लू काही अंतर उडू लागला. दिवसभराच्या प्रशिक्षणानंतर बुलबुल नर-मादी झाडावर बसायचे आणि पिल्लू जमिनीवर एखाद्या झुडपात दडून बसायचा. हा त्यांचा नित्यक्रम जवळपास चार-पाच दिवस चालला होता. आतापर्यंत बुलबुल नर-मादी यांच्या पिल्लू यांच्यासोबत आमचे निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांच्यासोबत आमची गट्टी जमली म्हणायला हरकत नाही. एके दिवशी दुपारी आम्ही सर्व कुटुंबीय हॉलमध्ये बसून पिक्चर पाहत होतो. त्यावेळी एक बुलबुल पक्षी आमच्या दारावर येऊन बसला आणि खूप चिवचिवाट करायला लागला त्याच्या सोबतच्या संवादा वरून काहीतरी अवघटीत काहीतरी अघटित घडले असावे असा आम्हाला अंदाज आला. आम्ही नवरा बायको आणि मुले बाहेर आलो, तसाच तो बुलबुल उडला आणि आमच्या घराच्या मागे असलेल्या झाडावर बसून चिऊ चिऊ करू लागला. आम्ही इकडे तिकडे पाहिले इकडे तिकडे पाहिले तेव्हा पिल्लू दिसला नाही. आम्हाला आम्हाला समजले की पिल्लू हरवला आहे. आम्ही पिल्लाचा शोध घेऊ लागलो. तेव्हा तो एका पाईप मध्ये असल्याचे मला दिसले. मी पापा च्या दुसऱ्या बाजूने एक बारीक काडी आत घातली. तसा तो पिल्लू पाईप च्या बाहेर आला. पिलाला पाहून बुलबुल नर-मादी आनंदाने चिवचिवाट करू लागले त्यांच्या तो आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. असा हा अवर्णनीय प्रसंग आमच्या जीवनात घडला हे आमचे भाग्य या या प्रसंगावरून असे समजते की, पक्ष्यांना सुद्धा आपली भाषा कळते, आणि सहवासाने पक्ष्यांची भाषा सुद्धा आपल्याला कळते. आपण पक्षांसोबत संवाद साधू शकतो हे या प्रसंगावरून या प्रसंगावरून मला कळले. ही एक माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय घटना आहे. ती घटना, माझ्यासाठी आनंददायी अशी घटना आहे.