Bluepad | Bluepad
Bluepad
पिणे आरोग्यासाठी का आहे डेंजरस?
S
Sachin Jadhav
14th May, 2022

Share

ऊन्हाळा म्हटलं की ज्यूस, सरबत या ही पेक्षा कोल्डड्रिंक्स पिण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. पण मन तृप्त करणारी कोल्डड्रिंक्स शरीराला घातक आहेत, याची आपल्याला कल्पना आहे का? चला तर जाणून घेऊयात की काय होतात कोल्डड्रिंक्सचे शरीरावर दुष्परिणाम?
  • लठ्ठपणा आणि मधुमेह:
कोल्डड्रिंक्समध्ये असणाऱ्या अतिरिक्त साखरेच्या प्रमाणामुळे वजन वाढण्याची खूप शक्यता असते. जे लोक खूप प्रमाणात कोल्डड्रिंक्सचे सेवन करतात त्यांना लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले असते. लठ्ठपणामुळेच पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो. त्याचबरोबर बाकीही शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. अनेक संशोधनातून ही बाब समोर आली आहे ज्यात सोड्याचे घातक परिणाम शरीरावर होतात.
  • आर्टीफिशियल स्विटनर नको रे बाबा:
कोल्डड्रिंक्सला गोडपणा येण्यासाठी त्यात आपण कायम वापरतो त्या साखरेपेक्षाही सॅक्रिनसारख्या आर्टीफिशियल स्विटनरचा वापर केलेला असतो. हे आर्टीफिशियल स्विटनर आपल्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतात. तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की आर्टीफिशियल स्विटनर यांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा संभव असतो.

पिणे आरोग्यासाठी का आहे डेंजरस?

  • कॅफिनचे परिणाम गंभीर:
कोल्डड्रिंक्समध्ये असलेले कॅफेन शरीरावर परिणाम करते. याच्यामुळे निद्रानाश होतो, रक्तदाब वाढतो. कोल्ड ड्रिंक्स वरचेवर प्यायल्याने शरीरातून पाण्याची पातळी कमी होऊन शरीर आतून कोरडं होतं. यासोबत किडनी, लिव्हर, हाडं, दाताचे विकार, ह्रदयविकार होण्याची शक्यता असते.
  • फॅटी लिव्हरचा धोका:
कोल्डड्रिंक्सच्या अतिरिक्त सेवनामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. कोल्ड ड्रिंक्समध्ये जी साखर असते ती दोन प्रकारची असते. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ते हे दोन प्रकार आहेत. ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये लवकर शोषले जाते आणि त्याचे पचन होते. पण फ्रुक्टोजचे पचन होण्याऐवजी केवळ ते यकृतामध्ये साठवले जाते. अशा परिस्थितीत जर आपण रोज कोल्ड्रिंक्स पीत असू तर आपल्या यकृतामध्ये फ्रुक्टोज जास्त प्रमाणात साठले जाईल आणि त्यामुळे फॅटी लिव्हर सारखे यकृताशी संबंधित विकार होतील.
  • दातांचे नुकसान:
जर आपण कोल्ड्रिंक्सचे अतिसेवन केले तर त्याचा परिणाम आपल्या दातांवरही होतो. फॉस्फोरिक अ‍ॅसिड आणि अन्य अ‍ॅसिड कोल्ड ड्रिंक्समध्ये असतात. ज्यामुळे आपल्या दातांचं नुकसान होतं. दात लवकरच ठिसूळ बनतात आणि पडून जातात.
आता एवढे दुष्परिणाम होत असतील तर कोल्डड्रिंक्सचे सेवन टाळालेलेचं बरे.

510 

Share


S
Written by
Sachin Jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad