शालेय शिक्षण देऊन नुकताच कुठे बाहेर आलो होतो सर्व काही नवं होतं याअगोदर आईवडिलांनी कधीच पंखाखालून बाहेर पडू दिलं नव्हतं आणि अचानक मला शहराकडे शिक्षणासाठी जायचा चान्स आला मी असा चान्स का बरं वाया जायला देऊ मी पण माझ्या आईवडिलांकडे हट्ट केला की माझे बरेचसे मित्र त्या कॉलेज मध्ये प्रवेश घेणार आहेत.
नाईलाजस्तव मला पण आईवडिलांनी परवानगी दिली. नवीन कॉलेज शाळेत कसा माणूस बंधनात असतो तसं ईथे बिलकुल नव्हतं त्यामुळे आम्ही सर्वजण अगदी बिनधास्त वागायचो. मुलींशी बोलणं त्यांची थट्टा मस्करी करणं एकत्र डबा खाणं यामुळे शिल्पा नावाची एक मुलगी माझ्या संपर्कात आली आणि देखते देखते दिल मे शिट्टी बजने लगी
मी समजायचे ते समजलो मित्र ही मला शिल्पा वरून चिडवू लागले.
उन्हाळा बघता बघता संपला आणि पावसाळा सुरु झाला आमचं गाव शहरापासून बरंच लांब असल्याने बस किंवा रिक्षा हे दोनच पर्याय आमच्याकडे होते बाईक मला चालवता येत होती पण घरची परिस्थिती
ही बेताची असल्याने मी थोडा गप्प होतो आता पावसाळा सुरु झाला तुम्हाला माहित असेल शहरापेक्षा गावाकडे पावसाचा ओघ जरा जास्त असतो त्या दिवशी महत्वाचं लेक्चर असल्याने मी कॉलेजला जायला निघालो माझ्या बऱ्याचशा मित्रानी आज दांडी मारली होती त्यात बस ही लेट होती करणार काय मग शेजारच्या मुलाची बाईक मागून घेतली त्याने नाय होय नाय होय करत दिली
किक मारून एकदाचा पळालो वाटेत चिखल साठला होता आणि अचानक मला शिल्पा नजरेस पडली बिचारी छत्री असूनही भिजून ओळीचिंब झाली होती मी जवळ जाऊन हॉर्न दिला त्या सरशी पटकन तिनं मागं पाहिलं मी बसायची खूण करताच पटकन उडी मारून ती मला चिपकूनच गाडीवर स्वार झाली त्याबरोबर अशी मी गाडी पळवली की शिल्पा ही थोडी अवाक होऊन माझं ड्रायव्हिंग स्किल पाहू लागली तिला माहित नव्हतं की मी एवढा खतरी ड्रायव्हर आहे ते.
तिनं मागून हात टाकून मला अक्षरशः जखडून टाकलं होतं वरून पाऊस आणि ईकडे चिपकलेली शिल्पा असं हे चित्र मला एखाद्या सिनेमांत मी हिरोची भूमिका तर पार पाडत नाही ना असं एका क्षणापुरतं वाटून गेलं.
त्या दिवशी मी लेक्चर बंक केलं आणि जाम एन्जॉय केलं परत तो क्षण आयुष्यात आला नाही...
फक्त राहिल्या त्या पहिल्या प्रेमाच्या पहिल्या पावसाच्या एकत्र भिजल्याच्या आठवणी...
विलास एस ठाकूर
डोंबिवली