समीर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात राहणारा वयवर्ष 5-6 असावेत.अतिशय खोडकर स्वभाव पण मनमिळावू. शेजारी-पाजारी फिरणे.खेळायला जाणे तो रोज सायंकाळी सातत्याने करीत असे .त्याला रिदिमा नावाची मोठी बहीण होती. समीर चे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. ते अतिशय भले माणूस.त्याची आई गृहिणी. घरकाम करणे .मुलाबाळांना सांभाळणे हेच तिचे जग.ते सुखवस्तू कुटुंब होत.घरात अगदी लहानापासून तर मोठ्या पर्यंत सर्वांचाच birthday ते साजरा करीत असे.त्यांच्या कडे वाघ्या नावाचा एक पाळीव कुत्रा होता.ओळखीच्या व्यक्ती दिसला की तो उंच मान करायचा. त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वच त्याच्या परिचयाचे होते.एकदा त्यांनी वाघ्या चा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.
सर्वाना आग्रहाचे निमंत्रण दिले.त्यांच्या घराचे नाव विसावा होते.त्यांच्या विरुद्ध दिशेने शिवपुत्र नावाचा वाडा होता.तेथे एक परिवार राहायचा.त्यांना देखील आमंत्रण दिले होते. तेथे निर्वेकर नावाचे गृहस्थ राहायचे.ते एका कॉलेज ला प्राध्यापक होते.अतिशय तल्लख बुद्धीचे.ते नावाजलेले शिक्षक होते.त्यांची पत्नी गृहिणी होती.
झालं तर आज वाघ्या चा वाढदिवस .अगदी माणसाप्रमाणे च समीर च्या घरातील मंडळीने कार्यक्रम साजरा केला.वाघ्या साठी एक केक आणला गेला .बाहेरून आलेली मंडळी जरा वेगळ्याच आनंदात होती.तो वाढदिवस एक पाळीव कुत्र्याचा आहे.करिता सर्वांना आगळा वेगळा वाटत होता. त्यांनतर जेवायची मजा. जेवायला खास मेनू.मस्त वांग्याची भाजी,पोळ्या,भात, श्रीखंड,पुरी,भजी,कोशिंबीर. त्याचा सुवास घरभर दरवळत होता. तेवढ्यात,निर्वेकर काकूंची मोबाईल ची बेल वाजली ,"हॅलो ,समोरून एक व्यक्ती बोलतो,हॅलो"माझं नाव विवेक आहे मी सोनेगाव टेकडीच्या बाजूच्या रोड वरून बोलत आहे.हं बोला, निर्वेकर आपले कोण आहेत,समोरचा व्यक्ती बोलला,काकू म्हणाल्या माझे पती, त्यावर तो म्हणाला ,त्यांचा गाडीने अपघात झाला आहे.तुम्ही त्यांना घायला या.मी इथल्या चहा टपरीवर काम करतो. असे बोलून तो फोन ठेवतो.
इथे सर्व खाण्यात मौज करण्यात गुंग होते.त्याना ग्लानी अली आणि त्या पडल्या.सर्व त्यांच्या भोवती जमा झाले.त्यांना त्यांच्या घरी सोडून देण्यात आले.त्या शुद्धीवर आल्यावर सर्वाना कळले की ,निर्वेकरांचा अपघात झाला.लागलीच समीर च्या वडिलांनी गाडी काढली .त्यात आजूबाजूचे काही टेकडीच्या दिशेने जायला निघाले.निर्वेकरांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.आणि उपचार सुरू झाले.दररोज शेजार पाजारचे त्यांना भेटायला जात. आणि सोबत जेवायला डब्बा घेऊन जात.4-5 दिवस उलटले आणि निर्वेकर बरे होऊन घरी परतले.
निर्वेकरांनी बरे झाले या आनंदात एक पूजेचे आयोजन केले.सर्व शेजार पाजरील मंडळीला जेवायला सांगितले.भेटीगाठीच्या दरम्यान समीर च्या वडिलांना बघून ते शांत चित्ताने त्यांना म्हणाले,दादा " धन्यवाद.तुम्ही एवढ्या रात्री ला देवासारखे धावून आलेत.माझा जीव वाचवला.मी घरी परतताना मला बार दिसले आणि मी ड्रिंक घेतली.माझे भान नव्हते.त्यात मी पुढे पुढे जात गेलो.आणि रस्ता भटकलो.त्यात टेकडीच्या पायथ्याशी धावत येणाऱ्या ट्रक चे दिवे माझ्या डोळ्यात चकाकले आणि माझा तोल जाऊन मी खाली पडलो.असे बोलून ते थोडेसे शांत झाले.कार्यक्रम आटोपला सर्व आपापल्या घरी परतले.निर्वेकर आपल्या पत्नीला म्हणाले,आज हे आजूबाजूचे लोक देवासारखे धावून आले.देव कुठल्या रुपाने येईल काही सांगता येत नाही . हे आहे आजच्या काळातील शेजारधर्माचे महत्व
हा तर झाली निर्वेकरांचा अनुभव हल्ली मोठमोठाल्या शहरांमध्ये शेजार धर्म केवळ एक संकल्पना म्हणून राहिलेला आहे.हल्ली जागेचा अभाव म्हणून मोठमोठाल्या इमारती बांधल्या जातात.त्यात तर शेजारचे दरवाजे बंद .कोण कोणास ओळखत देखील नाही.काही ठिकाणी तर निव्वळ काचेच्या इमारती.काय त्यात फक्त एकमेकांशी स्पर्धा.परस्परांच्या सुखात सुख मानणे दुःखात धावून जाणे हे केवळ नाममात्र राहिलेले.पूर्वी शेजार पाजऱ्यांशी एकोप्याने राहणे आवश्यक समजल्या जायचे .आता काय तर प्रॅक्टिकल वागणे लोकांना पसंत पडू लागले.कोणाशी काही देवघेव नाही .कोणाची चौकशी नाही .कसली विचारणा नाही.पूर्वी घरातील भाजी संपली की शेजारच्या काकू कडली आणली जात .आणि आपल्या घरची नेऊन दिली जात.हा क्रम लहान मंडळींसाठी लागून असायचा.लग्नसराई असली की आपले पाहुणे शेजारच्याकडे असायचे.शेजारधर्म हा काही जात पात, धर्म,वंश,गोत्र,परंपरा, काहीच बघितला न जाणार धर्म आहे.केवळ एकोपा कायम ठेवा ."एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ."एवढ्या एका गोष्टीवर अवलंबून आहे.