सांजसमयी कातरवेळी
गंध फुलांचा गेला सांगून
अंतरी ओढ तुझी लागते
करूनी सांज शृंगार ऊभी
दारात तुझी वाट पाहते
या सांजवेळीचा काय सांगू मी महिमा.... उधाणलेल्या सागरी किनारी .... कातरवेळी ..... मावळत्या सूर्याच्या सुवर्ण प्रकाशात..... शेंदरी रंगाचे प्रतिबिंब तरंगत होते पाण्यात.....सहज कुणाची तरी आठवण करून देणारी हि कातरवेळ... मनाच्या एकांतात असंख्य आठवणींच्या लाटा उसळत होत्या....या विरहाच्या सागरात या मासोळीची धडपड चालू होती... तुला एकदाच भेटण्याची ..... ओढ लागली होती.... नजर क्षितीजाच्या पलीकडे शोधत होते फक्त तुला .. मला माहित आहे.... तुला कातरवेळ खूप आवडते....त्या संधी प्रकाशात..... नेहमी मावळत्या सूर्याचे तुला फोटो काढायला खूप आवडतात...... नेहमी तुझा प्रयत्न असायचा... नारळाच्या झाडावर आड लपलेला सुर्य आणि झाडावर बसलेला पक्षी ....असे लोकेशन नेहमी तू निवडत असे... फोटो शुट करताना तुझी नजर कॅमेरातून हळूच माझ्याकडे वळायची ... केसांवर हात फिरवताना मी दिसले की लगेच तू माझ्या नकळत फोटो काढायचा.... उडणारे केस, गालावरचे स्मित हास्य असे अनेक माझे फोटो कॅमेऱ्यात कैद करून ठेवले आहेस.....
हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे रेशमी निवारा
हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो
अंगावर शहारा
तुझ्या आठवणींची हि सांज सावली येते. प्रेमाच्या स्वप्न वेलीवर वेडे मन माझे सख्या रे झुलते...... क्षणोक्षणी मिठीतले घालवलेले ते क्षण मनाच्या काळजात प्रेमाच्या रंगात नेहमीच तरंगत आहे... ओंजळीत स्वर तुझे मिठितला श्वास माझा नजर माझी लाजरी स्पर्श तुझा होताना..... कसे सांगू प्रीत वेड्या काटा रुतला मनाला तू धरला अबोला ..... आयुष्याचा रस्ता चालता चालता मी स्वत:शीच पुटपुटत होते...या विरहाच्या सागरात दु:खाच्या असंख्य लाटा ह्रदयावर आदळत होत्या... माझा एकटाच जीव माश्या सारखा तरफडत होता... आयुष्य किती क्षणभंगुर असतं ना...आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून जात तेव्हा एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले की डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली जाते. त्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत .... प्रेमाचा सागर किनारा आठवून... उगाचच पण रमत कातरवेळी आठवणींच्या गुंत्यांत ....ठाऊक आहे मनाला तो रस्ता अनोळखी झाला आहे ..तरी पण का मन वळतेय .... ओल्या रेतीत पायाखालची वाळू हळूहळू निसटून जाते... तसतसे एकमेकांत गुंफलेले हात अलगद निसटून गेले.....कळलेच नाही कधी ... आठवतो तुझा मला पहिला स्पर्श ....ती आठवण होताच .... प्रेमाच्या पाकळ्या फुलतात... ह्रदयाची स्पंदने व्याकूळ होतात... अचानक तुझ्या अस्तित्वाची आठवण होते.
प्रीत तुझी माझी गुणगुणते गीत ओठी शब्द हे सजले
कातरवेळी तुझ्या आठवणीतले काटे ह्रदयात हे रूतले
या कातरवेळी तुझ्या आठवणींचा... ...विरहाच्या सागरात अजूनही आठवतोय प्रेमकिनारा ...!!!!!!
....सौ. अनिता आबनावे ©®