Bluepad | Bluepad
Bluepad
ब्रेकअप झालं तरी एक्स प्रेमात आहे?
A
Akshara Bhave
14th May, 2022

Share

'प्रेमभंग' हा शब्द प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी शापच आहे. जीवापाड प्रेम केल्यानंतर त्या व्यक्तीपासून दुरावणे ही भावना पचवणे अशक्य असते. त्यामुळे काहीजण ब्रेकपमधून पूर्णपणे बाहेर येत नाहीत. किंवा बाहेर जरी आले तरी त्या व्यक्तीवर कुठेतरी आतल्याआत प्रेम करताना सुद्धा पहायला मिळतात. हे असते ब्रेकपनंतरचे प्रेम. मग ब्रेकअपनंतर सुद्धा ते आपल्या प्रेमात आहेत हे कसे ओळखायचे ते आज आपण वाचूयात.

१. तुमच्या संपर्कात असतात -
ब्रेकअप झालं की दोघांमधील नातं पूर्णपणे तुटत. त्यानंतर एकमेकांचे नंबर ब्लॉक किंवा डिलीट होतात. सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केले जाते. कारण नातं तुटल्यावर एकमेकांशी संपर्क ठेवायचा नाही हा त्यामागचा हेतू असतो. पण जर तुमचा पूर्व प्रेमी तुम्हाला कुठूनही ब्लॉक किंवा अनफॉलो करत नसेल आणि तुम्हाला मेसेज करून संपर्कात ठेवत असेल तर त्यांचे अजूनही तुमच्यावर प्रेम आहे ओळखून जा.

२. तुमचे गिफ्ट सांभाळून ठेवतात - ब्रेकअपनंतर खरी मजा असते जोडीदाराने दिलेल्या गिफ्ट्सची. काहीजण तर माझे गिफ्ट परत दे म्हणून सरळ मागून घेतात. आणि काहीजण आठवणी सोबत नको म्हणून गिफ्ट टाकून देतात. पण जी व्यक्ती ब्रेकअपनंतर सुद्धा तुमचं गिफ्ट सांभाळून ठेवत असेल तर तिचा जीव तुमच्यात अजूनही अडकला आहे समजून घ्या.

३. तुम्हाला जळवण्याचा प्रयत्न करतात -
ब्रेकअप झालं तरी मला काही फरक पडत नाही असे जर ती व्यक्ती दाखवत असेल तर तिला जास्त फरक पडतो हे लक्षात घ्या. कारण अशी व्यक्ती तुम्हाला जळवण्यासाठी मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही मुला किंवा मुली सोबतचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करतील. असे जर पूर्व प्रेमी करत असेल तर त्यांचं मन तुमच्यासाठी झुरत आहे एवढं मात्र नक्की.

ब्रेकअप झालं तरी एक्स प्रेमात आहे?

४. तुम्हाला अचानक भेटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात - ब्रेकअपनंतर जोडीदार समोरासमोर आले तर ती परिस्थिती दोघांसाठीही थोडी अन्कम्फर्टेबल होऊन जाते. मग अशावेळी एकमेकांच्या नजरेला नजर द्यायची नाही. एकमेकांना टाळायचे असे होते. मात्र तो किंवा ती अशी परिस्थिती छान हाताळून तुमच्याशी हसत चेहऱ्याने आणि सकारात्मक बोलत असतील तर ते तुमच्यावर अजूनही प्रेम करतात.

५. तुमच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली तर त्यांचा तिरस्कार करतात - तुम्ही जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला डेट करू लागलात किंवा फ्रेंडझोन मध्ये जरी त्यांच्यासोबत असलात तरी पूर्व प्रेमीला हे आवडणार नाही. असे जर झाले तर त्यांच्या मनात अजूनही आपण आहोत हेओळखा.

६. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात -
काही वेळेस तुझ्यात अमुक गोष्ट नाही म्हणून सुद्धा ब्रेकअप केले जाते. म्हणजे चांगली नोकरी नाही, राहणीमान व्यवस्थित नाही, तुझं व्यक्तिमत्वच आकर्षक नाही, इंग्रजी बोलता येत नाही अशी अनेक कारणे असतात. मग पूर्व प्रेमी जर स्वतः मध्ये आमूलाग्र बदल करून तुमच्या समोर येत असेल तर हे फक्त त्याने किंवा तिने तुमच्यासाठी केले आहे समजून घ्या.

७. भूतकाळाविषयी बोलतात -
प्रेमाच्या आठवणी या कधीच विसरता येत नाहीत त्या मनामध्ये बंदिस्त असतात हेच खरे आहे. मात्र ब्रेकअपनंतर लोक त्या विसरल्या जरी नाहीत तरी आठवणी काढताना दिसत नाहीत. पण तुमचा पूर्व प्रेमी जर तुमच्या सोबतच्या रोमँटिक आठवणींमध्ये आजही हरवत असेल तर तो किंवा ती नक्कीच अजूनही तुमच्यात आहेत.

मग तुमच्या बाबतीत सुद्धा असं कधी झालं आहे का? आठवा तुम्ही ब्रेकअपनंतर कधी या गोष्टी अनुभवल्या आहेत का? असं जर झालं असेल तर तुमचा पूर्वप्रेमी देखील तुमच्यावर प्रेम करतोय हे समजून जा.

518 

Share


A
Written by
Akshara Bhave

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad