प्रत्येकाची सर्व स्वप्ने
साकार व्हावीत
कोणी ना दुःखी
या जगी
असा एक दिवस यावा
अपेक्षाचे ओझे दूर व्हावे
सर्वजण आनंदाने नाचावे
प्रत्येकाच्या ओठी हसू असावे
असा एक दिवस यावा
कि कोणीच कोणाशी
भांडण तंटा न करावा
सर्वचजण एकत्र येऊन
गुण्यागोविंदाने नांदावे
असा एक दिवस यावा