आज सकाळी मला उठायला थोडा उशीरच झाला . घड्याळ्यात पाहिले तर ७ वाजुन 19 मि. झाले होते. खिडकीच्या लहान फटीतुन सकाळच्या कोवळ्या प्रकाशाची किरणे आत उमटली होती . मी उठले अन् खिडकी जवळ जाऊन उभे राहिले होते . तेवढ्यात दुधवाला दाराच्या बाहेर आवाज द्यायला लागला . दुधवाला सुद्धा आला म्हणजे आज मला खूपच उशीर झाला असे स्वतःशी च बोलत मी पटकन दुध घेवुन किचन रूममध्ये गेले . गेल्यावर पाहते तर काय ? माझे हे म्हणजे माझा पती ..स्वंयपाक रूममध्ये काहीतरी बनवत असल्याचे दिसले . मी अचानक चकित झाले, आज अचानक हे इथे कसे काय ? मी दोन मिनिट तिथेच उभा राहून विचारात पडले . काय झाले असावे बर! माझ्याकडुन काही चुकले तर नसावे ना ? रात्री ऑफिस मधून आल्यावर तर चांगल होत सर्व काही मग आज सकाळी सकाळी असे स्वंयपाक रुममध्ये ???
मी त्याच विचारात पडून राहिली आणि बाहेरच्या खोलीत जावुन बसले . मन त्याच गोष्टीत होते. आता स्वयंपाक रुममधुन बाहेर आल्यानंतर मला हे ओरडणार? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते. तेवढ्यात हे दोन्हीं हातात दोन डिश पोहे बनवलेले घेवुन आले अन् टेबलवर ठेवले . मी एक टक पाहतच होते. नंतर एका तांब्यात थंड पाणी आणि ग्लास घेवुन आले.