हिंदू धर्मात हनुमानाची अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा,आराधना केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, हनुमान हे असं दैवत आहे, जे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात. प्रभु श्रीहनुमान, हे असे देवता आहेत, जे कलियुगातही पृथ्वीवर विराजमान आहेत. बजरंगबली चिरंजीवी आहेत. आपल्या भक्तांवर येणारी प्रत्येक संकटे दूर करतात, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या दु:खांपासून, भीतीपासून मुक्ती आणि आपल्या प्रिय हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचे नियमित पठण करायला हवे.
मागच्या भागात आपण २१ ते ३० चौपायांचा अर्थ पाहिला. आता पुढील चौपायांचा अर्थ पाहूया.
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता॥31॥
अर्थात, आपल्याला देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे, ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता.
राम रसायन तुम्हरे पासा,।
सदा रहो रघुपति के दासा॥32॥
अर्थात,आपण निरंतर श्री रघुनाथाच्या म्हणजे प्रभुरामाच्या चरणात राहता, ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारापणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे.
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम जनम के दुख बिसरावै॥33॥
अर्थात, आपलं भजन केल्याने श्रीराम अर्थात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि जन्म जन्मांतराचे दु:ख दूर होतात.
अन्त काल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि भक्त कहाई॥34॥
अर्थात,आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम, अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं आणि जर पुन्हा जन्म घेतला तर तो हरिभक्ताच्या रुपात मिळतो. रामभक्त म्हणून आपण ओळखले जातो.
और देवता चित न धरई।
हनुमत सेई सर्व सुख करई॥35॥
अर्थात, हे हनुमान ! आपली सेवा केल्याने सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होतात, मग इतर देवतांच्या सेवेची गरज भासत नाही.
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥36॥
अर्थात, हे वीर हनुमान ! आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात.
जय जय जय हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरु देव की नाई॥37॥
अर्थात, हे स्वामी हनुमान! तुमचा जयजयकार असो. जय हो, जय हो. आपण कृपाळू होवून सदैव माझ्यावर कृपा करा.
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई॥38॥
अर्थात, जो कोणी या हनुमान चालीसाचे शंभर वेळा पठण करेल, तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल.
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥39॥
अर्थात, भगवान शिवशंकर साक्षी आहे की याचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील, निश्चित यश प्राप्ती होईल.
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा॥40॥
अर्थात, हे नाथ हनुमान ! तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे. म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा.
|| दोहा ||
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सूरभूप॥
अर्थात, हे संकटमोचन पवनकुमार ! आपण आनंद मंगल स्वरूप आहात। हे देवराज ! आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा आहे.
हनुमान चालीसाच्या शेवटच्या दोहामध्ये संत तुलसीदास बदरंगबली हनुमान यांना अभिवादन करतात आणि आपल्या हृदयात निवास करण्याची विनंती करतात. पराक्रमी बजरंगबलीचा आशीर्वाद घेण्यासाठी हनुमान चालिसाचा जप करा असे सांगितले जाते.
तेव्हा बोला बजरंगबली की जय l पवनपुत्र हनुमान की जय ll
हनुमान चालीसाचा भावार्थ चार भागात आपल्यासाठी दिलेला आहे. पहिल्या भागाला उदंड प्रतिसाद दिल्यामुळे पुढील भावार्थ लिहीण्याची प्रेरणा आणि बळ मिळाले. कमेंट करून आपला अनुभव नक्की शेअर करा.
पहिल्या दहा चौपायांचा अर्थ https://www.bluepad.in/article?id=108944 या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
११ ते २० या चौपायांचा अर्थ https://www.bluepad.in/article?id=111289
येथे क्लिक करुन वाचू शकता.
२१ ते ३० चौपायांचा अर्थ https://www.bluepad.in/article?id=112998
येथे क्लिक करून वाचू शकता.