काही वेळाने ड्रायव्हर, क्लीनर आले. प्रवाशांबरोबर आलेले नातेवाईक बसमधून उतरत होते. रमेश मित्रांना म्हणाला - मावशीला कळव आणि गावी पोहोचल्यावर फोन करेन, असे सांग. रमेशचे मित्र बसमधून उतरले.
क्लीनरने दरवाजा बंद केला. बस सुरु झाली, हळूहळू पुढे सरकत होती. रस्त्यावर रहदारी खूप होती. मावशी आणि मित्रांपासून काही दिवस दूर जात असल्यामुळे रमेशचे मन थोडे उदास झाले होते.
पुढे एक स्टाॅप येणार होता. तिथे काही प्रवासी बसमध्ये येणार होते. बसमध्ये एसी सुरु होता. स्पीकरवर कोळीगीत लागले होते. कोळीगीते नेहमीच मन उत्साही करतात, त्यामुळे सर्व प्रवासी मजेत ऐकत होते.
काही वेळाने बस एका स्टाॅपवर थांबली. प्रवासी बसमध्ये आले आणि आपल्या सीटवर बसू लागले, सामान ठेवत होते. क्लीनरने सर्वांची तिकीटे पाहिली. बसचा दरवाजा बंद केला. बस सुरु झाली.
(क्रमश:)