Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ .....
विश्वास बीडकर
14th May, 2022

Share

शुभ शनिवार .
बालपण खूप गरीबीत गेलं असेल आणि नंतर सुबत्ता आली असेल तर स्वभाव बदलतो का ?
बॅंकेत होतो तेंव्हा माझी एक , तामिळीयन सहकारी होती . मातृभाषा तामिळ . मुळं गावं केरळातलं अतिशय खेडं होतं .
लग्ना नंतर ती मुंबईत आली .
त्या काळात लेजर्स होती . एखाद्या खात्यात ट्रांझेक्शन झालं की खूण म्हणून त्या खात्यात एक कागदाचा कपटा ठेवावा लागे . पुढच्या चेकींग साठी . त्याला नाव होतं कापला .
प्रत्येकाच्या टेबलावर ते कापले पडलेले असायचे .
संपले की शेजारच्याला मागायचे . त्यांची किंमत अतिशय नगण्य . जून्या जाड कागदांचे ते कापले असतं .
त्या तामिळ सहकारी महिलेला जर कापले मागितले तर ती हमखास विचारायची ,
" कितना चाहिये "
तसचं डेबीट क्रेडिट व्हाउचर्स चे गठ्ठे पडलेले असायचे . आपल्या जवळचे संपले आणि घाई असली तर ते ही शेजारयाकडून हक्काने मागायचे हा अलिखित नियम . हे देखील कुणी तीला मागितले तर , ती उलट विचारायचीचं ,
" कितना चाहिये किंवा How many ? "
इतर सहकारी तिच्यावर चिडायचे ,
" तेरे घरसे लायी है क्या . देना जितना हात में आया उतना ."
पण ती संख्या सांगितल्या शिवाय द्यायची नाही .
हे माझ्या ही लक्षात आले होते .
एक दिवस तिला मी एकच प्रश्न विचारला ,
" मॅडम आपका बचपन कैसा
था "
भरल्या डोळ्यांनी उत्तर आलं ,
" चौथी पर्यंतची शाळा मी धुळाक्षरांत शिकली आहे .
पाटी - पेन्सिल मी पाचवीतचं पाहिली . अत्यंत गरीबी मी अनुभवली आहे ."
काटकसर करत जगणं ही तिची गरज होती .तसाचं स्वभाव होणं हे अपरिहार्य होतं .
बॅंकेत कसलीही पार्टी असली तरी जेवणाचं नियोजन ती स्वतः ओढून घ्यायची .
मागवलेलं जेवणाने सगळे तृप्त होतं आणि मुख्य म्हणजे अन्नाचा एक कणही उरत नसे .
आज हे सगळं आठवलं आणि निष्कर्ष समोर आला ,
" स्वभावाला औषध नसते पण परिस्थिती ठरवते स्वभावाला औषध लागेल का ते ."
विश्वास बीडकर .
१४ मे २०२२ .

183 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad