Bluepad | Bluepad
Bluepad
प्रेमात मैत्री..........
भावना
भावना
14th May, 2022

Share

तुझ्यात आणि माझ्यात
अंतर शून्य असतांना,
मग काय जगाची गरज मला,
सोबत तू असतांना
आकाशात जाऊन
रंगवेन इंद्रधनुला,
पुसणार नाहीत छटा त्या
तुझ्या प्रेमाचा रंग असतांना
होतील शिखरे सर आणि
मिळेल आकाश यशाचे,
मनात भाव मैत्रीचे
अन् हृदयात प्रेम असताना
परवा नाही मला जगाच्या
स्तुतीची किंवा निंदेची,
शेवटपर्यंत तुझ्या ओठांवर
नाव माझं असतांना
हजारो येतील संकटे
आयुष्य उभे जगतांना,
वादळेही जाऊया चिरून
हातात हात असतांना
नको मला त्या खोट्या शपथा
जीव तुझ्यात असतांना,
मुक्त होऊया फसव्या जगातून
स्वातंत्र्य एवढे असतांना
रमून जावे स्वप्ननगरीत
सौंदर्य तुझे बघतांना,
पाहिला मी स्वर्ग सुखाचा
खळखळून तुला हसतांना
वाट सोडेल दुःखही
प्रेमात मैत्री असतांना,
नाही सोडणार तुला एकटे कधी
श्वासात श्वास असतांना
पाहिला रुपेरी चंद्र तुझ्यात
रात्र चांदणी असतांना,
शृंगाराची काय गरज तुला?
हसू चेहऱ्यावर असतांना......

176 

Share


भावना
Written by
भावना

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad