Bluepad | Bluepad
Bluepad
अंजली
p
pradip izardar
14th May, 2022

Share

"अपूर्ण. "
पूर्तता व्हावी तशी,
कधि ती झालीच नाही
पूर्णता म्हणालीस जरी,
ती तशी उरलीच नाही.....
मागचे येणे तुझे ,
जरा जुलमीच होते
नात्यातील हिशेब मी,
कधि केलेच नाही.....
होते ओठावर कुणाचे,
नांव धाग्यात भिनलेले
तु कधि विणलेस ते,
मी कधि जानलेच नाही.....
आता दिलाच्या चौकटीवर का ?
दस्तक देतेस कळेना
तु नावाच्या भिंतीस कधि,
तडे गेले समजलेच नाही.....
काल रस्त्यावर भेटलेली,
वावटळ जुनीच होती प्रदिप
तीने उडवून नेल्या कागदाला,
मात्र वाचले कधिच नाही.....
********
कवी-प्रा.प्रदिप प. इजारदार

182 

Share


p
Written by
pradip izardar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad