आमचे बालपण व जीवनाचा बराचसा काळ आमचे मुळचे गाव "तांदळा" इथेच गेला. तीथे राहुन आम्ही आमचे शीाक्षण कोणतेही त्या वेळेस दळणवळणाचे साधन नसतांना फार कठीन परीश्रम घेऊन पुर्ण केले.
शीक्षणा बरोबरच सुट्टीच्या काळात घरी आल्यावर छोटे मोठे शेतीतील काम करुन, आपले खेळाचे सर्व शोक जोपासत आम्ही आदीवासी असल्यामुळे आमच्या वाडवडीला कडुन
आलेले शीकारीचे तंत्र शीकुन घेतले. व छोट्या मोठया शीकारी बरोबरच जंगलात जाऊन रान मेवा आनने या मध्ये धांवडयाचा डींक, चारोळ्या वेचणे, टेंभुरण, तोडुन आनने,
ते बरेचसे मुळकंदापासुन ते बऱ्याचशा रोगात उपयोगी पडणाऱ्या वनस्पती गोळा करणे. इत्यादी सर्वच कामे आम्ही
फावल्या वेळात करायचो त्यात कही वेळेस जंगलात, नदीनाल्याच्या ठिकाणी हे सर्व प्रकार करण्यासाठी टीम वर्क ची गरज पडायची मग त्यातुन कोणत्या कामाची आवड कोणाला आहे. हे पाहुन आमची कामा नीहाय एक टीम बनायची. व मग ती टीम घेऊन त्या कामाला आम्ही पुर्ण कराचो यातुन मनाला एक वेगळाच आनंद मीळायचा व एक प्रेतेक वेळेस छोटे मोठे धोके पत्कारून एक नवीन अनुभव मीळायचा..
नदीनाल्यात मासे पकडणे यामध्ये काही सोप्या मासे पकडण्याच्या पद्धती असतात जसे पडदा लावुन मासे पकडणे,गळाने मासे पकडणे, या साऱ्या पध्दतीने मध्ये फारच मोजके लोक लागतात व या मध्ये शीकार झाली नही तरी, नदीनाल्याच्या ठीकानी यला पर्यायी उपाय म्हणून "कोल्हेरी" ची भजी असते तीचा जेवनात एक चविष्ट पालेभाजी म्हणुन उपयोग होतो.
पडदा लावुन मासे, पकडणे. त्यात मासे हाती नही लागले तर
"कोल्हेरी" भाजी आनने यात माझा जवळचा सहकारी म्हणजे ती माझी बहीन "छाया" ति बरेचदा माझ्या सोबत राहुन पडदा लावुन मासे, पकडणे, गळाने मासे पकडणे 'किंवा मांड लाऊन मासे पकडणे, या पध्दतीत ती नेहमी माझ्या सोबतच आसायची या मध्ये माझा जवळचा मीत्र रामचंद्र करचे व त्याची बहीन ऊकंडाबाई हे दोघे बहीनभाऊ असायचे त्यामुळे आम्ही दोघे बहीन भाऊ व रामचंद्र करचे व त्याची बहीण ऊकंडाबाई हे दोघे आमची टीम ठरलेली आसायची. मग ते पडदा लाऊन मासे पकडणे असो, की "कोल्हेरी" ची अन्यपर्यंत आम्ही चोघे सोबतच असायचो मी व रामचंद्र 12 ते13 वर्षाचे तर आमच्या बहीन छाया व ऊकंडाबाई 8 ते 9 वर्षाच्या होत्या. आम्ही सतत टीमवर्क करुन जात असल्याने आमच्यात चांगलीच गट्टी जमली होती. आम्हाला एकमेकाच्या आवडी नीवडी पासुन सर्वच महित होते. मासे पकडण्यासाठी व कोलहेरीची भाजी आनण्यासाठी अम्ही सतत सोबत जायाचे. कोल्हेरीची भाजी म्हणजे एक वेल असायचा व तो झाडाझुडपावर व कधी कधी उंच झाडावर चढलेला आसायचा व मी रामचंद्र उंच जागी जाऊन त्याच्या फांद्या तोडुन खाली टाकायचो व ते फांद्या माझी बहीन व ऊकंडाबाई जमा करायच्या व नंतर आम्ही त्याचे गाठोडे बांधुन घराकडे जायाचो यात कधी कधी
आमचा सामना झाडावर विचंवासोबत तर कधी धामण, तर कधी सेलाटी जातीच्या सापा सोबत व्हायचा. असाच एक किस्सा "धामण" जीतीच्या सापा, सोबत घडला तो सीन आजही विचार केला की डोळ्यासमोर जसाच्या तसा आठवतो.....