Bluepad | Bluepad
Bluepad
स्मार्ट सिटी मिशन.....
Vilas Thakur
Vilas Thakur
14th May, 2022

Share

स्मार्ट सिटी मिशन हे एक सरकारचं उत्तम पाऊल आहे ज्यायोगे शहराचा विकास होतो तो पण आधुनिक पद्धतीने.
आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. ईथे दर पाच वर्षांनी सरकार बदललं जातं व त्याजागी नवीन सरकार अस्तित्वात येते पहिल्या तेच सरकार जर पुन्हा आले तर ठीक नाहीतर मग पूर्वीच्या सर्व योजना ह्या बारगळतात. आणि त्याठिकाणी नवीन योजना जन्म घेतात.
माझा सांगायचा उद्देश एकच आहे की स्मार्ट सिटी योजना ही कागदावरून प्रत्येक्षात यायला संपूर्णतः सरकार जबाबदार असतो त्यासाठी निधीची गरज असते जागेची गरज असते त्याची एक ब्लू प्रिंट बनवली जाते ती संमत केली जाते त्यानंतरच प्रत्यक्ष योजना ही अस्तित्वात येते.
स्मार्ट सिटी बनवायची झाली की ब्लू प्रिंट नुसार जागा ऍकवायर करावी लागते ती ताब्यात घ्यावी लागते आणि सर्व अटी आणि नियमांचे पालन करुन स्मार्ट सिटी ही बनवली जाते.
स्मार्ट सिटी मिशन हे बहुतांशी कागदावरच राहते याचे कारण आहे कधी कधी जनता अशा योजनाना विरोध करते कारण त्यांची जमीन वगैरे त्यासाठी समर्पित करावी लागते अगदी तुटपुंज्या भावात आणि याला जनता मग तयार होत नाही आणि सरकारला मग काढता पाय घ्यावा लागतो...
तर कधी कधी पहिल्या सरकारने मंजूर केलेली योजना दुसरं सरकार मानत नाही आणि त्याला केराची टोपली दाखवली जाते आणि मग हे स्मार्ट सिटी मिशन हे कागदावरच rahte

179 

Share


Vilas Thakur
Written by
Vilas Thakur

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad