कितीदा काहूर दाटते
मनाच्या गाभाऱ्यात,
उध्दवस्त झाल्या आशा अपेक्षा
करुनी काबाडकष्ट दिवसरात्र
नाही ठेवली हो कुणी जाणीव उपकाराची
मला नजरे आड करून...!
मध्येच अर्ध्यावर डाव सोडून गेले
दु:खाच्या दरीत ढकलून दिले,
नाही दिली कोणीच मला साथ
मतलबी दुनिया , स्वतःचाच फक्त स्वार्थ
कोणतीही अपेक्षा न ठेवता...!
निस्वार्थ सेवा केली आज
माझ्या पाठीमागे अनेकदा डावपेच आखले...!
गोड बोलून अनेकदा विश्वासघात केला
आपलेच आपल्यानी पाठीशी खंजीर खुपसले
रक्ताचेच क्षणात झाले परके,
बाहेरच्या लोकांवर तरी कसा ठेवायचा विश्वास?..!
आता नाही राहिला कोणावरही भरवसा
अनेकदा पडली पदरी निराशाच
निष्पाप जीवाचा बळी पाहून,
खूपदा खचकले मी, पण हार नाही मानली
अश्रू डोळ्यातून कधीच नाही वाहिले
नेहमी आनंदाने हसतच राहिले....!
पुन्हा एकदा नव्याने उभा राहू कशी?
प्रश्न पडला मला, समजेना असे झाले
कारण माझा आधारवडच हरपला,
सत्य वागणाऱ्या या जीवाला
कधी न्याय मिळेल का?
आजही वाट पाहते देवा
कधी तू मला न्याय देशील याची?...!
.....✍️ कवयित्री अनुश्री
अनिता आबनावे ©®