Bluepad | Bluepad
Bluepad
तारणहार नरसिंह अवताराची अशी करावी पूजा…
V
Vineet Bhave
14th May, 2022

Share

प्रल्हाद हा राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा श्रीहरी विष्णूचा भक्त होता. ‘नारायण नारायण’ असा सतत जप करणाऱ्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले पण ते त्याला शक्य झाले नाही. अखेर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला जो दशवतारातील चौथा अवतार आहे. अर्धे माणसाचे आणि अर्धे सिंहाचे शरीर असेलला हा नरसिंह अत्यंत उग्र प्राणी भासत होता. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला खांबातून नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. म्हणून या दिवसाला नरसिंह जयंती असे म्हणतात. आज आपण जाणून घेऊयात नरसिंहाची पूजा, बीज मंत्र तसेच त्यांच्या महिमांबद्दल.

१) नरसिंहाची पूजा कशी करावी:
नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफ सफाई करावी. दुपारच्या वेळी गोमूत्र, तीळ, माती आणि आवळा एकत्र करून शरीराला मालिश करून घ्यावी आणि शुद्ध पाण्याने अंघोळ करावी. नरसिंहाचा अवतार सूर्यास्ताच्या वेळी झाला होता त्यामुळे संध्याकाळी नरसिंहाच्या प्रतिमेसमोर दिवा लावून प्रसाद आणि लाल फुल अर्पण करावे. तसेच लाल रेशमी धागा अर्पण करून परत तो उजव्या हाताला बांधून घ्यावा. त्यानंतर मनातील इच्छा देवते पुढे सांगून खाली दिलेल्या नरसिंह मंत्रांपैकी आपल्यासाठी योग्य असेल त्या मंत्राचा जप करावा. ही पूजा मध्यरात्री सुद्धा करता येते. जर तुम्ही व्रत धरत असाल तर पाणी किंवा फळ हा आहार घेणे उत्तम राहील. दुसऱ्या दिवशी गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करून व्रताची सांगता करावी.

२) नरसिंह मंत्र:
नरसिंह देवतेचे वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे मंत्र आहेत. तुम्ही संकटात असाल तर आपत्ती निवारण मंत्र, कर्जाने त्रस्त असाल तर लक्ष्मी नरसिंह मंत्र, जीवनातील सुख समाधानासाठी नरसिंह बीज मंत्र, ज्या प्रकारे विष्णूचे नामस्मरण करणाऱ्या प्रल्हादाला संकटातून तारले होते अगदी तसेच हा देव सर्व भक्तांना संकटातून मुक्त करतो. आता आपण विविध नरसिंह मंत्रांची माहिती घेऊया.

उग्र नरसिंह मंत्र / आपत्ती निवारण मंत्र
ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम्॥
याचा अर्थ असा होतो की हे श्रीहरी विष्णू तुम्ही तेजस्वी आणि सर्व शक्तिमान आहात. मृत्युला जिंकलेल्या हे देवा, मी स्वतःला तुमच्या चरणी समर्पित करीत आहे.
हा मंत्र कसा म्हणावा ते पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
https://youtu.be/ghOd7lPtskk

नरसिंह बीज मंत्र
हा बीज मंत्र 'श्रौं'/ क्ष्रौं असा आहे.
यात क्ष् चा अर्थ नृसिंह, र् म्हणजे ब्रह्म, औ म्हणजे दिव्यतेजस्वी, तर अनुस्वराचा अर्थ सर्व दुःख नाहीसे करणारा असा आहे. या बीज मंत्राचा अर्थ दिव्यतेजस्वी ब्रह्मस्वरूप श्री नरसिंह तुम्ही माझे सर्व दुःख दूर करा असा होतो.
हा मंत्र कसा म्हणावा ते पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
https://youtu.be/ix8xDSJ07h0

संकटमोचन नरसिंह मंत्र:
ध्यायेन्नृसिंहं तरुणार्कनेत्रं जी सिताम्बुजातं ज्वलिताग्रिवक्त्रम्।
अनादिमध्यान्तमजं पुराणं परात्परेशं जगतां निधानम्।।
याचा अर्थ असा होतो की, जर तुम्ही कोणत्या संकटात आहात, तुम्हाला संकटांना सामोरे कसे जावे हे समजत नसेल तर श्रीहरी विष्णू किंवा नरसिंह यांची पूजा करून वरील संकट मोचन नरसिंह मंत्र म्हणावा. तुमचे सर्व संकट दूर होतील.

भगवान नरसिंह गायत्री मंत्र
ॐ वज्रनखाय विद्महे तीक्ष्ण दंष्ट्राय धीमहि । तन्नो नरसिंह प्रचोदयात।।
https://youtu.be/s0-w8F2Thow

 तारणहार नरसिंह अवताराची अशी करावी पूजा…

३) नरसिंह मंत्र कसा म्हणावा:
सर्वप्रथम नरसिंह देवतेच्या प्रतिमेची मनोभावे पूजा करावी. दोन लाडू, २ लवंग, २ गोड पानं आणि एक एक नारळ नरसिंहाला नैवेद्य दाखवावे आणि लाल रंगाच्या आसनावर दक्षिणेला मुख करून एक हजार वेळा जप करावा. मंत्र जपाच्या वेळी तुपाचा दिवा अवश्य लावावा.


४) नरसिंह मंत्राचे फायदे:
नरसिंह मंत्रामुळे भूतबाधा, भीती, तंत्र मंत्र बाधा, अकाली मृत्यू येणे अशा संकटांपासून मुक्ती मिळून आयुष्यात शांती मिळते. सर्वप्रकारचे शत्रू, आपला विरोध करणारी मंडळी शांत होतात. मन एकाग्र होऊन आत्मविश्वास वाढतो आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

५) महादेवाने नरसिंहाला कसे शांत केले:
राक्षस हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर सुद्धा नरसिंह अत्यंत रागात होता. तो इतका उग्र झाला होता की त्याच्यामुळे सृष्टीचा विनाश होईल अशी भीती सर्व देवतांना वाटत होती. त्यामुळे देवांनी भक्त प्रल्हादाला नरसिंहाकडे पाठवले. आपल्या लाडक्या भक्त प्रल्हादाला पाहून तो आनंदी झाला. परंतु त्याचा राग पूर्णपणे शांत झाला नाही म्हणून देवतांनी महादेवाकडे नरसिंहाला शांत करण्याची विनंती केली. महादेवांनी त्यांचा प्रथम गण वीरभद्रला पाठवले. परंतु तरीही नरसिंह शांत झाला नाही तेव्हा महादेव शरभाच्या रूपात प्रकट झाले. शरभाला एक हजार हात होते. तो नरसिंहापेक्षा प्रचंड शक्तिशाली होता. शरभाने दोन पंखामध्ये नरसिंहाला पकडुन फडफड केली. तेव्हा नरसिंहाचा राग शांत होऊन त्याने महादेवाची स्तुती केली.

नरसिंहाने आपल्या शरीरातून सिंहाची कातडी काढून शरभाला दिली आणि नरसिंह विष्णूच्या मूळ रूपात प्रकट झाले.
शरभ आणि नरसिंहाची ही युद्धकथा तुम्ही खालील लिंक वर वाचू शकता.
https://bluepad.in/share/rsMCCZkiQyvuzbB79

६) हा रक्षण करणारा अवतार:
भक्त प्रल्हादासाठी धावून येणारा नरसिंह हा त्याच्या भक्तांचा हाकेला धावून जातो. तुम्ही सुद्धा नरसिंह चतुर्दशीला त्याची पूजा, अर्चना करून, बीज मंत्र म्हणून शांती आरोग्य, ऐश्वर्य यासाठी प्रार्थना करू शकता. हा लेख कसा वाटला हे नक्की कमेंट करून नक्की सांगा.

498 

Share


V
Written by
Vineet Bhave

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad