Bluepad | Bluepad
Bluepad
पावसाच्या अगणित आठवणी
सतीश लोंढे
सतीश लोंढे
11th Jun, 2020

Share"पाऊस पहिल्या सारखाच आहे जसा सुरु व्हायचा तसाच बरसातो आहे बेफाम ....आता सुद्धा नुकताच सुरु झालाय असंख्य दिवसा उन्हाच्या लाहया लाहया सोसल्या नंतर एक दिलासा... पाऊस मला माझ्या आता पर्यन्त तीन टप्प्यात भेटला आहे...

माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस म्हणजे अतिशय वेंधळा आणि शहाना पाऊस नेमका शाळेत जायच्या वेळी थाम्बायचा, हो पण कधी कधी मेहरबान सुद्धा होत होता आणि सुट्टी... जसा कळतोय आठवतोय 5-6 वर्ष्या च्या त्या कोवळ्या वयातला अनुभवलेला पाऊस ..कारण त्यात लगबग असायची ति शाळा सुरु झाल्याची... वह्या पुस्तका ची रेलचेल वेगळी च होती... आई ने दिलेल्या पैश्या मधून खरेदी ला सुरुवात होत होती ,,जी आज लाखात उलाढाल करून पण त्याची बरोबरी होत नाही.

आयुष्यात दूसरा पाऊस म्हणजे ऐन उमेदि मधला तारुन्यात नुकताच पदार्पण जाहले आहे असा आभास करून देणारा तो पाऊस , दहावी नंतर हाफ पैंट जाऊन अंगावर आलेली फुल पैंट त्याचा आनंद अजुन वेगळा हे आज च्या मुलांना कधीच नाही समजनार... कॉलेज मधले ते दिवस मित्रांचा घोळका, पास केलेल्या कमेंट्स , त्यात मोबाइल नावाचा यंत्र अजुन आमच्या सहवास मधे यायचा होता, खुप सुखी होती लाइफ, फेसबुक नाही, व्हाट्स एप नाही, कसलाच वाद नाही होती ति फ़क्त निर्मळ मैत्री, संवाद आणि सुख दुख
वाटन्याचि आवड़... आता माणसाची मन पन यांत्रिक झालीत सुख दुःखा ची स्टेटस ठेवली पाठवली की कर्तव्य करून मोकळ झाल्याची भावाना..

आता जो पाऊस येतो तो फ़क्त मोठ झाल्या ची जाणीव करुण देतो , पाऊस पडला तरी घरी थांबता येत नाही,लोकल किती ही लेट असेल तरी , भिजत ,लटकत का होइना जाव लागत,, नाही गेले की मग सुरु होतो लेट मार्क , अब्सेंट आणि हाफ डे चा खेळ..नाही राहु शकत घरी.. कारण आता चा पाऊस आठवण करून देतो तुझ परिवार आहे , घर आहे मुलांची शाळा , नाही गेलास तर वेड्या घर कस चालणार, तू जस तुझ्या वयात मला अनुभवल आहेस आता ति वेळ दुसऱ्याची आहे. आता मि तुला भिजवल तरी तो ओला स्पर्श तुला सुखावेल , कारण मेंदू नावाच्या यंत्रा मधे आणि मन नावाच्या कोठारा मधे खुप साठवून ठेवल आहे , त्याला थोड़ हलक कर , जमलच तर थोड़ रड सुद्धा तुझ्या आसवांची किंमत माझ्या पेक्षा कोन करणार .आणि तुला कुणी ओळखत नाही जस मि तुला ओळखतो वर्षानुवर्षे ....


सतीश लोंढे✍️✍️✍️✍️✍️🏔️🏝️🌑☂️🌧️🌦️🌦️🌨️🌨️⛱️🌫️
पावसाच्या अगणित आठवणी

7 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad