Bluepad | Bluepad
Bluepad
नको नको हा उन्हाळा....
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
14th May, 2022

Share

नको नको रे उन्हा तू..
झोंबू असा या अंगाला
लोटउजळून आला
जाळ मना छेदी मना मनाला
काही बोलू जावे तर
झाले शब्दाचे विस्तव '
कशापायी दावशी तूं तुंझ्या मनीचे वास्तव ...'
असा हा उन्हाळा. सगळ्या अंगाला भिडून नुसता जाळ आणि धुरच करणारा. घरात बसवत नाही. घामाने अंगाचे पाणी पाणी करणारा. झाल्या पाण्याला मधूनच पिळून काढणारा उन्हाचा पिळा असला तापल्या चरकात स्वतःला पिळत तुम्हा आम्हा सार्यांना पीळ देणारा हा उन्हाळा. बाहेर जावं घरातून तर ऊन सगळीकडे ल्हाssलहा ss karit निपचित पडलेले झाडाच्या सावलीला कुत्रं पडावं तसे. पाखराची झाडा झाडा वरली फडफड त्यांची पाण्यासाठीची तडफड अंगणात पिवळ्या पितळीतल्या पाण्यात कोरडी चोच बुडवून ओले ओले करून घेत हाती. दुरवरल्या शेतातल्या गोठ्यात असलेली जनावरे गळ्यातली बारीक घंटा राहून राहून वाजवून पाण्यासाठी, चाऱ्यांसाठी हाक देत होती.
रानातल्या आंब्याच्या सावलीत सुरपाटीचा डाव रंगला होता. सदऱ्याच्या बाहीला अंगातला डोक्यावरून गालावर येणारा, कधी डोळ्याच्या पापण्याना बुडवून काढत ओघालणारा घाम टिपून काढता काढता ओलावलेला सदरा खेळणाऱ्याच्या ध्यानी मनी नव्हता.
रस्ता तापला तवा चुलीवर ठेवलेला. वातावरणात चुलीची धग. घरातले थंड पाय तळव्यातून निखारा कधी झाले आणि तापू लागले कलेची ना. आभाळाकडे पहावत नव्हते चुकून पहिलेच तर भक्कक्कन सूर्य अंगावर आग ओकायचा. आग बोचायची फार आग आग करायचे तन मन. असला ताप उन्हाचा आई ss आई ss ग आई आठवायची. काहींना रस्त्यावर राम आठवायचा. डोक्यावर छत्री धरावी आपल्याच समाधानासाठी. छत्रीत घुसून ऊन आत डोकीत जायचे. छत्रीतल्या छत्रीत ' डोस्क फिरलाया, गड्याचे डोस्क फिरलाया ' असे होऊन जायचं. रस्त्यावरच्या माणसानी आपले चेहरेच हरवलेले. नेहमी स्वतःला कुठल्यातरी विचारात हरवून चालणारे आज चेहरेच हरवून बसले स्वतःचे. रुमालात पुरुषांचे, ओढणीत बाया माणसाचे. अर्धे लपेटून गेलेले. समोरच्याची ओळख पुसून टाकली उन्हाने. ऊन तापते ऊन हीच त्यांची ओळख. ' 'किती उकडतेय नाही ' ' नुसता भटारखाना झालाय शरीराचा संताप तोही तापतच येतो.उन्हाचा ताप इतका असह्य होतो मन म्हणते,
' ' नको नकोरे उन्हाळा तुझा जीवघेणा धिंगाणा '
इतका तापतो इतका तापतो हा उन्हाळा की मोठा ही भोळ्या शंकरास विनवतो,'
' सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय,
शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर

152 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad