Bluepad | Bluepad
Bluepad
घरकोन -43
Radhika  Kulkarni
Radhika Kulkarni
14th May, 2022

Share

#घरकोन- 43
©राधिका कुलकर्णी.
गेले तीन दिवस होऊन गेले पण उन्मेशचा एक फोन नाही की काहीऽऽ नाही.
रेवाची तगमग हळुहळू वाढायला लागली होती.
बरं तो म्हणालाय की मी फोन करतो म्हणजे तो करेल,वाट पाहण्यावाचुन रेवाकडे दुसरा पर्यायही नव्हता.
रोजच्याच रूटीनमधे दिवस चालले होते.विचार काही संपत नव्हते आणि घालमेल मात्र उगीचच वाढत होती.
'मन चिंती ते वैरी न चिंती' तसे एक म्हणता दहा विचार एकाचवेळी मनावर गारूड करत होते.
तेवढ्यात फोन खणखणला.
धावतच तिने रिसिव्हर उचलला.
उन्मेशचा आवाज ऐकुन तिला कोण आनंद झाला.
गेले तीन दिवस वेड्यासारखी ती ज्या आवाजाची वाट पहात होती तो एकदाचा कानावर पडला.
"हाय उन्मेश!,कसा आहेस?"
"अरे किती उशीर फोन करायला!"
हाय डिअर,मी ठिक.
अगऽऽ खूप बिझी होतो गं.
गेले तीन दिवस रात्र-रात्र बसुन सगळ टुरवर्क कम्प्लिट केले.मला लिव्ह मागायची हिम्मतच होत नव्हती बॉसकडे.
म्हणुन आधी माझ्या जर्मन टुरचे पेपरवर्क रेडी केले म्हणजे तो नाही म्हणुच शकु नाही सुट्टीला."
"मग बोललास का बॉसशी?"
"दिली का सुट्टी त्याने?"
"अगंऽऽ तेच तर सांगायला फोन केलाय ना."
"मी बॉसकडे पर्सनल काम आहे सुट्टी हवीय असे बोललो.आधी तर झापलाच मला नेहमी प्रमाणे.
प्रेझेंटेशन वर्क कुठवर आलेय विचारल्यावर फाईल त्याच्यासमोर ठेवली.
काम बघुन एकदम चिडीचुप झाला.
मग 'ओके्केऽऽ यु कॅन गो' असे म्हणाला.
मी थँक्यु म्हणत केबीन बाहेर पडतच होतो तर पुन्हा भोचकपणे विचारलाच कुठे चालला आहात?मी सांगीतले की बेंगलोरला तर लगेच मागचे कुठलेतरी आमचे बेंगलोरच्या ब्रांचचे पेंडीग काम त्याला आठवले,लगेच दिले ना माझ्यामागे चिकटवुन.
म्हणाला,मग जाताच आहात तर तेही काम व्हीजिट करून कम्प्लिट करून या.
माझी तर सटकलीच मग.
मग मीही बोललो,"सर मग ही ऑफिशियल व्हिजिट असेल तर मी सुट्टी न घेता ऑन ड्युटी जाईन."
त्याला मी असे म्हणेल हे एक्सपेक्टेडच नव्हते.
मग तोंड वाकडे करतच हो म्हणाला.
अशा तऱ्हेने लवकरच मी येतोय तुला भेटायला.
हुर्रेऽऽ!!म्हणजे भेटही होणार आणि लिव्ह पण वाचणार आहे ना मज्जा!!"
"वॉव्ह!!" दॅट्स ग्रेट न्युज डिअर.मग कधी निघतोस?"
"मी आजच फ्लाईट्स चेक करून तुला कळवतो."
"चल मग भेटु लवकरच."
"उन्मेश,थँक्युऽऽऽऽ!"
"आय हॅव्ह नो वर्ड्स टु एक्सप्रेस,हाऊ कॅन आय थँक यु?"
एऽऽ बासऽऽ का,ही फॉर्मॅलिटी कधी पासुन आली गं आपल्यात?
"मी येवु की नको?"
"हे असले काही बोलणार असलीस तर मग मी प्लॅन कँसल करतो भेटण्याचा;चालणार का तुला?"
"अॅम सॉरीऽऽ.तु ये लवकर.मी वाट पहातेय तुझी."
"चल मी कळवतो लवकरच."
"बायऽऽऽ."
फोन बंद झाला तशी रेवा नकळत डोळ्यात तराळणाऱ्या अश्रुंना पुसत तिथेच बसुन राहिली.
खरच किती अनमोल आहे ना मैत्रीचे नाते.किती काय काय घडते पण ते सगळे बोलायला,सांगायला, मन मोकळे करायला हक्काचा कोपरा म्हणजे मैत्री.
अशी कित्येक वादळे आली तेव्हा हाच कोपरा रेवाने जवळ केला आणि ह्याच कोपऱ्याने तिला वादळातुन वाट मोकळी करायला मदतही केली.
आज पुन्हा एकदा मैत्रीतील प्रेम,विश्वास आणि मायेच्या अतुट नात्याचे तिला प्रत्यंतर येत होते.
मनावरचे बरेचसे ओझे अचानक हलके झाल्याची जाणीव रेवाला होत होती.
एका अश्वासक हाताची साथ तिचे बरेच काही मनसुबे साध्य करण्यात तिला यश मिळवुन देणार ह्याची खात्रीच जणु मनोमन पटवुन देत होती.
मनावरचा ताण हलका झाल्याने रेवाला नकळत झोप आली.गाढ निद्रेत किती वेळ झोपली तिचे तिलाच कळले नाही.
जाग आली तेव्हा संध्याकाळ उलटुन अंधार पडायला आला होता.
बापरेऽऽ अशी कशी अवेळी झोप लागली मला..
मनाशीच पुटपुटत ती बेडवरून झटकन उठली आणि तोंडावर पाणी मारून फ्रेश झाली.
देवघरात अंधार झाला होता.सगळे दिवे ऑन करतच ती देवघरात गेली.देवापुढे सांजवात केली.
उन्मेशच्या मदतीने योजलेल्या कार्यात तु माझ्या पाठिशी उभा रहा.आम्हाला आमच्या कार्यात यश दे देवा अशी मनोमन प्रार्थना करतच ती बाहेर आली.
मस्त फ्रेश वाटावे म्हणुन कडक चहा घ्यायची तिला तलफ आली.गॅसवर चहाचे आधण चढवुन ती कसल्याशा तंद्रीत उभी असतानाच पुन्हा फोन खणखणला.
आता कुणाचा फोन असा विचार करतच तिने रिसिव्हर उचलला.
"हॅलोऽऽ"
"रेवा मी सुशांत गं."
"अरे,तु अजुन ऑफिसमधेच कसा?"
हो,तेच सांगायला फोन केलाय,मला आज थोडा उशीर होईल यायला.
आणखी एक,उद्या मला अर्जंटली मुंबई जायला लागणार आहे ,तु मी घरी येईपर्यंत माझी बॅग जरा भरून ठेव.माझी रात्री उशीरा फ्लाईट आहे.
बाकी आल्यावर बोलतो,बायऽऽऽ."
बाय म्हणतच सुशने फोन ठेवला.
रेवाच्या मनात विचारचक्र वेगाने फिरू लागली.
देवा हि तुझीच तर योजना नाहिये नाऽऽ.नेमके ध्यानीमनी नसताना अचानक सुशला मुंबई का जावे लागतेय?
उन्मेशच्या येण्यात,भेटण्यात सुशचा कोणताही अडथळा येऊ नये म्हणुन तुच तर सहाय्यभुत होत नाहिएस ना!!"
"तसे जर असेल तर ही माझ्या कार्याला तु दिलेली हरी झंडी समजु का मी?"
मनातले स्वगत बोलता बोलताच ऊतु गेलेल्या चहाने रेवा भानावर आली.
पटकन गॅस बंद केला.विचारांचे बटन तात्पुरते बंद करून ती आता चहा घेता घेता सुशच्या बॅग पॅकींगमधे गुंतुन गेली.
अजुनही उन्मेशचा तो कधी येतो हे सांगणारा फोन आलेला नव्हता.
सुश नाहीये तोवर हा येवुन गेला तर बरेच होईल असा विचार रेवाच्या मनात क्षणार्धात येऊन गेला.
बघुया..देव जे काही करेल ते चांगल्यासाठीच असेल.
त्याचीच लीला तोच मार्ग दाखवेल आणि तोच सर्व घटनांची सांगडही घालेल.
आपण फक्त त्याचे माध्यम बनुन कार्य करत रहायचे ,नाही का.??"
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -43
#घरकोन -43
©राधिका कुलकर्णी.

152 

Share


Radhika  Kulkarni
Written by
Radhika Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad