Bluepad | Bluepad
Bluepad
बाबांचा शर्ट
विनय नारायण
विनय नारायण
14th May, 2022

Share

घरातला एक माणूस हे जग सोडून जातो तेव्हा त्याच्या आठवणी तर उरतातच पण त्याच्या वस्तू आणि कपडेही मागे राहतात. त्या जपणं महत्त्वाचं.
आज सकाळी आरशात पाहून केस विंचरताना पांढऱ्या शुभ्र केसांनी बाबांची आठवण करून दिली.. तेच ते पूर्ण पांढरे केस..चेहऱ्याची तीच ठेवण आणि मनातली भावनाही तीच.
माझे वडिल २००६ मध्ये गेले. मी त्यांच्यासारखा दिसतो, वागतो आणि मागेपुढे न पाहता खरं बोलून मोकळा होतो असं लोक म्हणतात. हीच मोठी जिवंत आठवण आहे माझ्या बाबांची माझ्यासाठी आणि लोकांसाठी.
मी वॉडरोब उघडून हँगरवरचा शर्ट घालून वॉकला निघणार तोच मुलीने मला थांबवलं... पपा वॉट आर यू वेअरींग...? आर यू ओके..??
मी स्वतः कडे पाहीलं..
बाबांच्या आठवणीत त्यांचाच एक शर्ट मी अंगावर चढवला होता...हे माझ्या लक्षातच नाही आलं.
विनय नारायण
१४ मे २०२२

179 

Share


विनय नारायण
Written by
विनय नारायण

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad