पुर्व दिशेला क्षितिजावर लालिमा दिसू लागते,आणि सप्त आश्र्वांच्या रथात विराजमान असलेले सूर्यदेव आसमंतात प्रकटतात एखाद्या अनभिक्षीतसम्राटा सारख त्याचं ते रूप पाहून या ओळी आठवतात .
.तेजोनिधी लोह गोल,भास्कर हे गगन राज!
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज!..
तेजातच जनंन मरण ,तेजतच नवीन साज!...
आपली सारीसृष्टी आप,तेज,वायू,पृथ्वी आणि आकाश अशा पंच महा भुतांनी मिळून बनलेली आहे.त्यातील तेज म्हणजे ऊन आपल्याला सूर्यापासून मिळते.हे तेज साऱ्या चराचराला संजीवन देते.
निसर्गचक्रा प्रमाणे वर्षाचे १२ महिने उन्हाळा,पावसाळा,हिवाळा या तीन ऋतूत विभागलेले असतात.बदल हा सृष्टीचा नियम असल्याने. ठराविक अंतराने ऱ्हास आणि पुन्हा नव्याने निर्मिती या नियमाप्रमाणे काही वृक्षांची हिवाळ्याच्या शेवटा कडे पानगळ सुरू होते हळूहळू ती झाडे वठल्यासारखी दिसुलागतात.पणं उन्हाळ्याची चाहूल देत ऋतुराज वसंत बहर घेवून अवतरतो, झाडांना नवी पालवीफुटते,भर उन्हात इवली पाने नव चैतन्याने सळसळू लागतात,आपल्याही तप्त देहातील मनाला कोवळीक फुटू लागते.हळूहळू मोठमोठे वृक्ष शिशिर, बहावा,पलाश,गुलमोहर,फुलांनी लगडून जातात. रस्त्याच्या दुतर्फा लाल,पिवळ्या,गुलाबी,जांभळ्या फुलांच्या पायघड्यवरून चालताना अज्ञात किमयागारचे सृजन मनातील प्रर्फुल्लता ओठावर आणते आणि भर उन्हाच्या काहिलीत चांदण पडत.
घराच्या परसदारी,किंवा अंगणात,टेरेसवर उन्हाच्या तडाख्याला न जुमानता मोगरा,गुलाब मुक्त पणे दरवळत रहातात.सदाफुली,अबोली आपल्या रंगीत छटांनी मोहित करतात.
पाणी जस जगण्यासाठी आवश्यक आहे त्या प्रमाणे जगण्याची ऊर्जा देणार सूर्याचं तेज मनाची मरगळ घालवण्यासाठी आवश्यक आहे.आपले अन्न तयार करण्यासाठी झाडांनाही प्रकाश संशलेशण करावे लागते.
सृष्टीच नियमन करणार ऋतुचक्र अखंड चालू रहाण्यासाठी पावसाल खेचून आणण्यासाठी समुद्राच्या पाण्याची वाफ करण्यास लागणाऱ्या आवश्यक असलेली उष्णता सूर्य किरण पुरवतात.
कितीही दाहक असला तरी संजीवक असलेला रविराज जेव्हा अस्तचला कडे निघतो त्या संध्येचे वर्णन भा रा.तांबे असे करतात
पिवळे तांबूस ऊन कोवळे , पसरे चौफेर!
ओढा नेई सोन वाटे वाहूनिया दूर!
झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी!
शेतावर कुरणात पसरला गुलाल चौफेर!
पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा!!
हळूहळू कातरवेळ सरून रात्र पडलि की शुभ्र चांदण्यात उद्या उगवणाऱ्या रविरजांची वाट पहात,आजीच्या गोष्टी ऐकता,ऐकता गाढ झोप लागते.
पूजा तुळशी बागवाले.