Bluepad | Bluepad
Bluepad
यशस्वी जीवनाची पंचसूत्री ! भाग ३,४, व ५
K
Kishor Bavdekar
13th May, 2022

Share

धाम !
धाम म्हणजे विश्रामधाम, चारधाम न्हवे तर आपले घर. विश्रामधामांत जाऊन विश्राम करायचा व चारधाम जाऊन तिर्थयात्रा करायची तसे नाही तर आपल्या घरांत राहून घरांत जी कामे करावी लागतात ती करणे. आपली स्वत.ची कोणती कामे हे लक्षांत घेणे महत्वाचे. घर हेच मंदीर. घरामध्ये खाण्यापिण्याची अद्ययावत व्यवस्था असणे हे महत्वाचे. तेंव्हाच आपली मुलभूत गरज पूर्ण होते. मानवी जीवनांत सर्वांत महत्वाचे काय तर अन्न. म्हणूनच म्हटले आहे, " अन्न हे पूर्णब्रह्म ". एकदा पोटोबा खूष झाले की सगळे खूष. पोटोबा नाराज तर सगळेच नाराज. त्यामुळे हा कार्यक्रमसुद्धा समयबद्ध, शिस्तबद्ध व नियमबद्ध असावयास हवा.नाहीतर, वेळच्या वेळी झाले नाहीतर सर्वच बेरंग होतो.
माणसाचे पोटसुद्धा एक प्रकारचे यज्ञकूंड आहे. ज्यावेळी भूक लागते त्यावेळी भूकेचा अग्नी प्रज्वलीत होतो. तेंव्हा या यज्ञकूंडात काहींना काही पचनशील, पौष्टिक पदार्थांची आहूती द्यावी लागते. एखादी गोष्ट सर्वांनाच पचनशील असेल असे काही नाही. प्रत्येकाची शरीरप्रकृती ही वेगवेगळी असते. आयुर्वेदानुसार यांचे विभाजन पित्त, वात व कफ या त्रीदोषांनुसार होते. या शरीरप्रकृतीनुसार पदार्थ पचनशील राहतात. अन्यथा काहीही खाल्ले तर अपचनाचा त्रास होऊन आरोग्य बिघडते. म्हणूनच कोणत्या गोष्टींची आहूती व ती किती प्रमाणात द्यायची याला महत्व. म्हणजे अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होऊन त्याचे सशक्त, शुद्ध रक्तात रुपांतर होऊन शरीर आरोग्य चांगले, मजबूत व ठणठणीत राहते. मानवी जीवनांत आरोग्याला अनन्य महत्व. आरोग्य चांगले राहीले की माणसाला कोणतेही काम करण्यास उत्साह व उर्जा प्राप्त होते.
त्याचप्रमाणे आरोग्य व शरीरप्रकृती ठणठणीत व चपळ राहण्यासाठी घरच्या घरी करता येण्यासारखे प्राणायाम व कपालभाती तसेच योगासने समयबद्ध, शिस्तबद्ध व नियमबद्ध रित्या करणे महत्वाचे ठरते.
यासाठी शिल्लक राहिलेल्या ११ ते १२ तासांपैकी ३ ते ४ तास पूरेसे होतात. त्यानुसार दैनंदीन कार्यक्रम आंखणे व त्यांचे शिस्तबद्धरित्या पालन करणे महत्वाचे आहे.
राम!
---------------
प्रतीदिन २४ तासापैकी निदान कमीत कमी १ तास मग जास्तीत जास्त कितीही परमेश्वर भक्ति करणे आवश्यक आहे.
या परमेश्वर भक्तित नामसाधना, थोर संत श्री.ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ रोज सायंकाळी अर्धा तास व संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ रोज सकाळी अर्धा तास परमेश्वर भक्ति भरपूर झाली.
या दोन्ही हरिपाठांचे वाचन करुन त्यांचा अर्थ जाणून घेतल्यास यांचा मतीतार्थ किती प्रभावी आहे हे सहज लक्षांत येईल. श्री.एकनाथांनी जो हरिपाठ सांगितलेला आहे त्यांतील प्रत्येक अक्षर, शब्द व वाक्य एव्हढे सखोल खोलवर संशोधन पूर्वक अर्थपूर्ण व मानवी जीवनांत समर्पक आहेत हे सहज लक्षांत येईल. ५५० वर्षांनंतरही श्री. एकनाथ महाराजांचे सांगणे आजच्या सामाजिक स्थितींत चपखल लागू पडते हे सहज लक्षांत येते. त्यामुळे या दोन्ही हरिपाठ दैनंदिनी वाचनाला फार मोठे महत्व आहे. माझ्या भक्ति या लेखात भक्ति बद्दल सविस्तर लिहिलेले आहे.
आराम
-----------------
आराम, विश्राम व शांत झोप यांचे मानवी जीवनांत अमर्याद महत्व आहे. रोज किमान ७ तास शांत झोप असावयास हवी. एकूण दैनंदीन २४ तासांपैकी ७ तास तरी किमान शांत झोप असणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे बाकीच्या १७ तासांत मनाला, बुद्धीला व शरीराला जे कष्ट झालेले असतात व त्यामुळे जी झीज झालेली असते ती झीज भरुन काढण्यासाठी, थकवा आलेला असतो तो दूर होण्यासाठी शांत झोप ही अत्यावश्यक आहे. तेंव्हाच माणसाचे आरोग्य व्यवस्थित व ठणठणीत राहू शकते. ज्यायोगे दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी माणूस ताजातवाना होऊन सज्ज राहू शकतो.
यशस्वी जीवनाची पंचसूत्री ! भाग ३,४, व ५
अशा प्रकारे यशस्वी जीवनाची ही पंचसूत्री आहे. या पंचसूत्री चे दैनंदीन व्यवहारांत काटेकोरपणे समयबद्ध, शिस्तबद्ध व नियमबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केल्यास मानवी जीवनांत हमखास आनंदी जीवनाचा लाभ होतो. आनंदी जीवन हेच यशस्वी जीवन, बाकी काही नाही. म्हणूनच या सर्व सूत्रांची एक दैनंदीन समयसारणी तयार करुन, कामांनुसार त्यांना योग्य प्रमाणांत समय विभागून त्यांचे शिस्तबद्ध पद्धतीने पालन करणे महत्वाचे. सुरुवातीला कठिण जाईल परंतू हळूहळू का होईना यास सुरुवात केल्यानंतर सहा महिन्यांनंतर या कार्यपद्धतीची चांगलीच सवय जडून अंगवळणी पडण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे आनंदी जीवन गाठण्यास सुरुवात केल्यानंतर निदान एक वर्ष तरी कालावधी लागेल. झटपट या विश्वात काहीच मिळत नसते. फक्त कामाला लागणे महत्वाचे. " आधी केलेची पाहिजे ". या सर्व सूत्रांत मानसिकतेला अनन्य महत्व आहे एव्हढे बाकी लक्षांत असावे.

207 

Share


K
Written by
Kishor Bavdekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad