माणसाचे जीवन म्हणजे सुखदु.खाचा एक खेळ आहे. हा खेळ उनसावलीसारखा म्हणून चालूच असतो. कधी चटके लागतात तर कधी हायसे वाटते. अशा सुखदु.खाच्या अनुभवांतून माणूस जीवनप्रवासाची वाटचाल करत असतो. यातील आठवणी माणसाला जीवनांतील चांगले वाईट अनुभव प्रदान करत असतात. यातूनच माणूस काहींना काही तरी शिकत स्वत.चा विकास करु शकतो, साधू शकतो. म्हणूनच ज्या ज्या व्यक्तिसोबत हे अनुभव आलेले असतात त्या व्यक्तिपेक्षा माणसाला हे अनुभव समृद्ध करत असतात. म्हणूनच या आठवणी निष्ठावान असतात.
काही लोकांसोबत आलेले अनुभव कटू , दु.खदायक, त्रासाचे तर काहींसोबत मधूर, गोड, सूखकारक. या अनुभवातूनच माणसाला दुष्कर्म व सत्कर्म यांची जाणीव होत असते. एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडली तर आपल्याला कसे वाटते? या भावनेतूनच माणसाला इतरांची सुखदु.खे कळू शकतात. त्यातूनच चांगले वाईट यांचे ज्ञान होते. यातूनच माणूस इतरांशी चांगले राहण्याचा प्रयत्न करत असतो.
आपल्या जीवनांत असे अनेक चांगले वाईट प्रसंग व त्यांचे अनुभव आपल्या गाठीशी असतात. याच वाटचालीत आपल्याला चांगली देवमाणसेसुद्धा भेटत असतात. त्यांच्या सहवासात आपल्याला योग्य प्रकारे वागण्याचे ज्ञान प्राप्त होते. आपल्यावर अनायासे चांगले सुसंस्कार होतात. जीवनाच्या प्रवासांत अशा प्रकारे भेटणारी माणसे केंव्हा केंव्हा आपल्या परिचयाचीसुद्धा नसतात. त्यावेळी आपल्याला माणूसकी चे दर्शन होते. या दर्शनाने आपल्यापुरता माणूसकी बळावत जाते. आपणही इतरांशी माणूसकीत प्रवास करु लागतो. असे काही नाही की जीवनांत सदैव वाईट माणसेच भेटतात. परंतू केंव्हा केंव्हा अशी अमानुष माणसे सुद्धा भेटत असतात तेंव्हा आपल्याला अमानुष वागणूकीचे सुद्धा दर्शन होत असते. त्यामुळे आपण अशा अमानुष माणसांपासून सावध रहायला शिकतो.
केंव्हा केंव्हा काही माणसे भयानक अडचणीच्या काळांत एव्हढ्या प्रचंड प्रमाणांत सहकार्य करतात त्यावेळी आपण प्रथमतः आच्छर्याने पाहातचं बसतो. असेही मानवी जीवनांत घडू शकते ? याचा आपल्याला धक्काच बसतो व त्यामुळे आपली बोलतीसुद्धा अवाक होऊन बंद होऊ शकते. अशा धक्कादायक प्रसंगातून अनुभवातून माणसाला आच्छर्यकारक माणूसकी चे दर्शन घडते. अशा सहकार्यामुळे माणसाचा विकास कधी झाला हे माणसाच्या लक्षांतसुद्धा येत नाही. माणूसकीत प्रेमाने जीवनाचा प्रवास करणाऱ्या माणसावर विश्वाचा मालक, सर्वेसर्वा परमेश्वर प्रसन्न व कृपावंत असतो. त्यामुळेच माणसाला असे धक्कादायक अनुभव जीवनांत प्राप्त होत असतात. त्यामुळेच अशी माणसे आपल्या जीवनांत माणूसकी मद्धे वाटचाल करत असतात. अशा माणसांचा जीवनप्रवास सदैव सहजरित्या चांगल्या प्रकारे चालूच राहतो. त्यांना जीवनांत कोणतीही अडचण भासत नाही.
म्हणूनच जीवनांत माणसापेक्षा माणसाच्या कृतीची आठवण इतरांना अनुभव प्रदान करत असल्यामुळे माणसापेक्षा आठवणी या अधिक निष्ठावान असतात.