Bluepad | Bluepad
Bluepad
मन झुरते....
सोमनाथ नारायणकर
सोमनाथ नारायणकर
13th May, 2022

Share

का?कसे! कुठे विचारते,
मन उरुन-ऊरुन झुरते....
विहार मन, नभी विहारते,
थबकते मन, परी ते झुरते....
कुचक मन, दर्पण तडकते,
दर्पणा ही, मन धडकते....
का? कसे! कुठे विचारते,
मन उरुन-ऊरुन झुरते.............
स्वप्न निद्रेत, ही दचकवते,
डोळ्यांचे पाते, न लवते....
मन हे असेच, तुझ्यात पांगते,
दुर दुरावे, मनास सांगते....
का?कसे! कुठे विचारते,
मन उरुन-ऊरुन झुरते............
ही भयाण, रात्र सांगते,
विरह ही, तलवार टांगते....
मज ना ही, दुरी शिणते,
का?तु, वेळ काढू म्हणते....
का?कसे! कुठे विचारते,
मन उरुन-ऊरुन झुरते..............
- सोमनाथ नारायणकर.....

237 

Share


सोमनाथ नारायणकर
Written by
सोमनाथ नारायणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad