Bluepad | Bluepad
Bluepad
ते अविस्मरणीय सात दिवस
sulbha wagh
sulbha wagh
13th May, 2022

Share

अविस्मरणीय 23 ते 30 ते सात दिवस 🌹 22 ला तयारी केली रात्री, निझामा बाद ने 23ला मुंबईला जाण्या ची, घरातुन पाय निघत नव्हता, सुनबाई बोलल्या नका जाऊ त्रास वाटत असेल तर, म्हटलं नको बाई महत्वा चे काम आहे जाऊ दे. आणि मला परिचित , नातेवाईका ना ही भेटायचंय म्हणुन मी कोरोना काळा नंतर पहिल्यांदाच एकट्या ने प्रवास केला. सुन बाई ने, खान पान माझ्या सामाना सह मला व्यवस्थित गाडीत बसाविले! गाडी लोणावळ्या नंतर थेट कल्याणला थांबल्या मुळे दोन तासात पोहचली. ए. सी बर्थ ला कंपऱमेन्ट रिकामाचं होता. घाटातील थंड गार हवा, तीन वेळा चहा पिऊन झाला. कल्याण आले. समोर बसलेल्या लेकराने मला बॅग सह खाली उतरवुन दिलें. थोडा त्रास होत होता, म्हणून अन वधाना ने पिण्या चे पाणी नि खाण तिथेच सोडले.माझ्या मैत्रिणीं चे बाळ फोन करून मला शोधत शोधत माझ्या जवळ पोहचल. म्हटलं बाबा खुप जड जड ओझी घेऊन हे ब्रिज चढलेत, आता एवढी हलकीशी बॅग घेऊन चढू शकत नाही, इथे आता कुली ही दिसत नाही. बाळ बोलले दे मावशी मी घेतो. तो व्यवस्थित मला घरी घेऊन गेला. माझी मैत्रीण स्मिता ने हात पाय धुण्या चे सोपास्कार झाल्या वर छान श्रीखंड पुरी चे जेवण जेऊ घातलं 🌹 मग मस्त गप्पा मारत थोडा आराम करत, चहा पित ती झिम्मा सिनेमा दाखविण्यास घेऊन गेली.माझ्या रुनुबंधाच्या नात्यात मी मला होणाऱ्या वेदना काही क्षण विसरून च गेले. रात्री दुसऱ्या मैत्रिणीं कडे कल्याण गोदरेज हिल ला मुक्काम केला. तिथे ही छान अर्ध्या रात्री पर्यंत गप्पा, दुसऱ्या दिवशी,नाश्ता खाण पिणं झालें. मग ऑफिसियल काम, हयाति च्या दाखल्याची करून घेतली, नि दुसऱ्या दिवशी नातवाला भेटायला गेले.दोन वर्षा चा आमचा आज्जी नातवा चा विरह आज संपणार होता. डोळे आनंद अश्रुनी ओले होत होते. माझ्या अथर्व ला मी डोळ्यात साठवुन घेतलं, दोन वर्षात माझा कान्हा छान उंच नि समजुत दार झाला होता, लिफ्ट मधुन बाहेर पडताना च त्याने माझी चाहूल घेतली. आणि ती पहा आज्जी आली, म्हणतं आनंदाने दरवाजा उघडला. माझ्या बाळकृष्णा च्या लिलान चा आनंद घेता घेता,विहीण बाईची जवस चटणी बाजरी ची भाकरी,दुधी हलव्या चा जेवणाचा आनंद घेताना माझ्या ऋणानुबंधा ची लेक श्यामल ड्युटी वरून सुट्टी घेत खास मला विक्रोळी ला तिच्या घरी न्यायला आली, तिने माझ्या साठी ओला रिक्षा, नि त्या पुढे तिची लुना करून मला विक्रोळी ला घरी आणल. परत आग्रह केला पॅटिस खाण्या चा, पण मला त्रास होतोय हें तिला जाणवत असावे. नाही नाही चला काकी डॉक्टर कडे म्हणुन ती मला dr. शहा च्या क्लिनिक ला घेऊन गेली. डॉक्टरा नी तीन डोस दिलें. घरी गेल्या वर पहिल्या च डोस मध्ये खुप बरे वाटले मला. मला चहा आवडतो म्हणुन तिने पुन्हा मस्त चहा केला, नि अर्धी रात्र आम्ही छान गप्पा केल्या. नातीने छान गप्पा गोष्टी नि नाच गाणी बोलुन दाखविली. आज्जी पणा चा आनंद पुन्हा एकदा छान च लुटला, तिच्या बरोबरं. दुसऱ्या दिवशी पाहुण चार, छान रसोई करून माझ्या श्यामल लेकीने मला कल्याण साठी ओला करून दिली. संध्या काळी, माझ्या नंदा नावाच्या मैत्रिणीं च्या आलिशान घरी पोहचले. आवर्जून माझ्या कडेच थांबायचे म्हणुन त्यांचा आग्रह. आम्ही पुर्वी चे इम्राळ सोसायटी चे शेजारी एका इमारतीत राहणारे. इथे पुन्हा मस्त खाण, अर्धी रात्र गप्पा, झाल्या, मग ऑफिसियल सहकारी फॅमिली ज्यांचे नाते वाहिनी भावा सारखे होते, जे माझ्या सुख दुःखा त, माझ्या पती च्या आजारपणात, मुली च्या लग्न, डोहाळ जेवणाच्या वेळी माझ्या बरोबर होते, त्या सौ कीर्ती नंदकुमार धारणे वाहिनी न च्या घरी लक्समी निवास ला त्यांना भेटून, मनसोक्त गप्पा मारून, त्यांचे नवीन घर पाहून,इतर नातेवाईका न कडे व दुसरी काम करण्यास बाहेर पडताना माझी स्वामी भक्त प्रिया, मला म्हणाली तुम्हाला बर नाही वाटत असे दिसतय, तुम्ही माझ्या पती च्या क्लिनिक मध्ये जा, संध्या काळ सर्व रिपोर्ट मिळतील. मला ही वाटल कोरोना मुळे आपण दीड दोन वर्ष घरात बंदिस्त होतो. खरंच सर्व चेक कराव. त्यामुळे च स्थूल पणा येऊन थकवा येत असावा. Dr अनिल उजगारे cum ऋणानुबंधा तील जामतच. माझ्या पती चे आयुष्य ही त्यांच्या प्रसंगावा
धान ते मुळे वाढले होते. माझा ऋणानुबंधी त मुलगा, माझ्या मुला चा मित्र राकेश रमले ने स्वतःच्या आटो ने फिरवत, सर्व तपासण्या करत नि ते रिपोर्ट बाळगत मला आयुष हॉस्पिटल ला अडमिट केलं.नंतर माझी कन्या, परी आली तिचं दर्शन ही मला दीड वर्षाने होत होते, तिला सुख रूप , छान पाहुन त्या ही अवस्थेत मला खुप बर वाटले. नंतर चे राहिलेले दिवस मी तेथील कर्तव्य तत्पर स्टाफ नर्स, डॉक्टर, आया जणु आपल्या घरातील च सदस्य आहेत अशी त्यांची माणुसकी ची वर्तुणूक मी हाताला सलाईन, ऑक्सिजन लावलेले असताना ही अचंब्याने पाहत होते. अशा हॉस्पिटल इमर्जन्सी मध्ये का बरे मृत्यु ही ओशाळणार नाही, असे क्षणभर वाटले. माझी लेक स्नेहल बिचारी 12=12 तास हॉस्पिटल बाहेर बसुन होती आई बरी होई पर्यंत. 30 नोव्हेंबर ला पुर्ण बरे झाल्या वर मला बाहेरच्या वॉर्ड मध्यें आणले, डिलक्स रूम होता तो तिथेच लेकी च माहेर पण ही झाल. 🌹 सुनबाई, विहीणबाई मेडिक्लेम चा हिशोब करून आल्या, औषध, रिपोर्ट च्या जमानाम्या सहित सुनबाई ने गाडीत बसविले.पावसा ची पर्वा न करता ड्राइविंग सुरु केले, त्रास होत असेल तर सांगा म्हणाली हळु चालवीते गाडी. म्हटलं नाही त्रास होत. या रक्ताच्या नि आरक्ता च्या नात्या ने मन खुप भरून पावलं. माझी स्नेहा, सुनबाई, विहीण बाई ही माझी घरची नाती. पण ही बाकी ची रुनुबंधा ची नाती ही तितकीच श्रेष्ठ. हॉस्पिटल ते परिचित, रक्त, आरक्ता च्या प्रत्येक नात्या चा अर्थ देवाने इथे उलगडून दाखविला. ट्रेन मधुन उतरवुन देणारा तो अपरिचित मुलगा, ते सर्व नात्यात स्वामी समर्थ अवतरत जणु मला मदतच करत होते. जीवनातील अखेर च्या वाटेवरचा सर्वोत्तम अनुभव मला जगण्या साठी नवं संजीवनी देऊन गेला. आणि शिकवण देऊन गेला की नाती अभेद्य सुंदर ठेवत त्यास जपण आपल्या हाती पण असते. जगण्या साठी नि आयुष्या चा शेवट परिपूर्ण सफल होण्या साठी रक्ता ची आरक्ता ची दोन्ही नाती महत्वा ची आहेत , हे बाकी खरे 🌹असे गेले ते सात दिवस मंत्र मुग्ध करणारा अनुभव होता हा. श्री स्वामी समर्थ 🌹 सुलभा हनुमान वाघ 🌹3=12=2021
ते  अविस्मरणीय सात दिवस

175 

Share


sulbha wagh
Written by
sulbha wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad