शूर आबांचा शूर छावा
म्हणती शिवराय माझे
स्वराज्यरक्षक धर्मवीर ते
आमचे छत्रपती शंभूराजे
महाराजांसाठी मौल्यवान
होता जीवनावश्यक भाग
मदतीस तत्परतेने धावला
ढाण्या स्वराज्यातील वाघ
सामर्थ्यवान चारित्र्यसंपन्न
राहिला योगी श्रीमंत राजा
महाराजांनंतर आद्यकर्तव्याने
सुखी समाधानी ठेवली प्रजा
सहले अन्याय अत्याचार तरी
नाही सोडला आपला देह प्राण
मराठ्यांची अवलाद म्हणून होता
शेवटच्या श्वासापर्यंत अंगी त्राण
स्वराज्याचा वीर सुपुत्र बनुनी
लावली प्राणांची झुंज देत बाजी
मरण आले तरी शरण गेला नाही
कारण फक्त रक्तात होता शिवाजी
मुघलांचा रोष पत्करुनी
दाविला तप्त मराठी बाणा
स्वराज्यप्रेमाखातर जगला
हिंदवी स्वराज्याचा राणा
अहोभाग्य आमचे गरीब राष्ट्राला
महाप्रतापी राजा संभाजी लाभला
धगधगत्या सह्याद्रीच्या वासलात
मराठ्यांचा झेंडा भगवा फडकला
- नयन धारणकर, नाशिक
8275838083