खिडकीबाहेर कोसळणारा वळीवाचा पाऊस.एक कंटाळलेली दुपार आळोखेपिळोखे देत जागी होतेय.चहाच्या गरम घोटागणिक आळसाचा एकेक वेढा गळुन पडत होता.
आज तु अगदी पहाटेच्या सुर्यकिरणांसोबतच आलासच.तिलाही तुझ्या येण्याची चातका सारखी ओढ असतेच अरे...... आणि हे लिखितच जणु युगानुयुचालत आलेले......पण तरीही हे गुपित शहाण्यापेक्षा वेड्यांनाच जास्त उमगलेले.पण तु मनमौजी ,वेडा,लहरी,ना तुला जगाची पर्वा ,ना लोकांच्या दुषणांची पर्वा.तुझी अशी आठवण आहे
तु
वळीवाचा पाऊस भावना झंकारीत आलास रेशमी पिसारेफुलवत गेलास ..
तु
निरागस चंद्रमा धुंद आसमंती आलास ंयुगायुगाचे बंध तजोडुन गेलास...
तु
गगनी कृष्णमेघ शामरंगी रंगातुन आलास आयुष्य चिंब भिजून गेलास...
मला तु मात्र कायमच मनातला वाटत राहिलास .एकवार पुन्हा एकदा वळीवाची सर आली आणि चिंब करत माती आनंदाने हसली.....