लिहायचं म्हटलं तरी खूप काही लिहावं वाटतं...
दुःख कधी मांडायच म्हटलं तर गप्प राहावं लागतं
सर्वस्व कधीतरी त्यागावच लागत
मागच सार विसरून पुढं चालावच लागत
क्षण क्षण आठवण येत राहतात ते क्षण
ओढी मध्ये एकमेकांना पहावंच लागत
सुरवात केली कधी तर त्याला अंत असतोच
पण अंत कधी तरी आठवून रडावच लागत
आयुष्य आहे हो हे चढ उतार होतच असणार
पाणी डोळ्यात असुदे किंवा नदीत वाहतच जाणार
जीवनाचा रंगमंच सुंदर झाला पाहिजे
अभिनय उत्तम जमवावाच लागतो.... शेवटपर्यंत!
@सतीश लोंढे✍️✍️✍️