Bluepad | Bluepad
Bluepad
Easy Target
भाई देवघरे
भाई देवघरे
13th May, 2022

Share

Easy Target
"बैसाखी" पंजाबी शिख समुदायाचा मोठा सण. १३ एप्रिल १६९९ शिख समुदायाचे दहावे गुरु - गुरु गोविंदसिंग ह्यांनी "खालसा पंथाची" स्थापना केली आहे. शिख समुदाय शेती मध्ये मेहनती. रब्बी पिकांच्या सफल कापणी साठीचा आनंदोत्सव म्हणून देखील हा सण साजरा केल्या जातो. शिख समाज म्हटला की "लंगर" हा शब्द जोडून आला.
"लंगर" जगभरात इतका प्रसिद्ध आहे की न्यायालयात एका न्यायाधीशाने निर्णय ऐकवला त्यामागची एक छोटीशी गोष्ट. कॅनडातील एका भुरट्या भुकेल्या ने एका दुकानातून"ब्रेड" पाकिट चोरले आणि पकडला गेला. त्याला पकडल्यानंतर न्यायाधीशाने विचारले की तू चोरी का केली? त्यावेळी त्या भुरट्या भुकेल्या ने सांगितले की मला भुक असह्य झाली. माझ्यापाशी पैसे नव्हते मग मी एक ब्रेड चे पाकिट स्वतः ची भूक शमविण्यासाठी चोरी केले. (ता.क. = भुरट्या भुकेला हे शब्द प्रयोजन एवढ्यासाठी जे मोठ मोठ्या चोऱ्या करतात, जे भुरट्या भुकेल्यांच्या ब्रेड चोरतात ते पांढरपेशे चोर, राजकारणी ह्यांच्यावर अशी वेळ येत नाही. ते कधी उपाशी नसतात.) त्यावेळी न्यायाधीशाने त्याला सोडून दिले आणि सांगितले की ह्यानंतर जर तुला भुक लागली आणि पैसे नसतील तर इथे पंजाबी समाजाचा २४ x ७ लंगर चालतो. तिथे जात धर्म विचारले जात नाही. सन्मानाने सर्वांना प्रसादाच्या रुपात जेवायला मिळते, तिथे तू जात जा आणि सन्मानाने आपली भूक शमविण्यासाठी हजेरी लावत जा. सर्व जगतात कोणाची जात पात न विचारता, लंगर नावाच्या प्रसादाने सर्वांचा जठराग्नी शांत करणारी जमात. मेहनतीला कुठे कमी न पडणारी जमात. तिळ, गहू, गन्ना ची शेती करून भरघोस पिकाचे उत्पन्न घेणारा शिख समुदाय. पंजाबी भांगडा नृत्य बघताना, जाणवते ते मर्दानी नृत्य कशाला म्हणतात! भरपूर मेहनत करून भरपूर मस्तीत राहणारा शिख समुदाय.
१३ एप्रिल १९१९ बैसाखी चा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो च्या संख्येने शिख बांधव जमा झाले होते. जालियनवाला बाग भिंतीनुमा बाग, बाहेर निघण्यासाठी एक छोटासा दरवाजा उघडा ठेवण्यात आलेला. एक छोटासा बाहेर निघण्याचा मार्ग जिथे पोटावर सरपटत सरपटत एक एक जण बाहेर निघू शकतो, एवढाच् बाहेर निघण्याचा बंदोबस्त करण्यात आला. सर्व शिख बांधव हर्षोल्लास मनवत होते आणि ब्रिगेडीयर जनरल डायर आपल्या काही पोलिसी तुकडी सह तिथे अवतरला. कुठलीही पुर्वसुचना न देता त्याने नि:शस्त्र शिखांवर गोळ्या चालविण्याचे आदेश दिलेत. तिथे जमलेल्या शिख माणसे, स्त्रिया, मुले सर्व नि:शस्त्र त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. विचार करा. हर्षोल्लास मनविण्यात दंग असणारे शिख, एकाएकी मातम मध्ये माहौल बदलला. एकंदर १६५० गोळ्या झाडण्यात आल्यात. अधिकृत आकडेवारीनुसार ३७९ शिख मृत्युमुखी पडलेत. कित्येक जखमी झालेत. अनधिकृत हा आकडा कितीतरी जास्त आहे असे सांगतात. त्यानंतर डायर इथेच थांबला नाही. त्याने बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग बंद केला आणि पोटावर सरपटत निघण्याचा मार्ग जो निमुळता मार्ग होता त्याठिकाणी त्याने बाहेर डोके निघाले की त्या डोक्याला बंदुकीच्या बट ने कुचलणे सुरू ठेवले. त्या सर्वांना २४ तासांसाठी अक्षरशः ओलिस ठेवण्यात आले. जे मरणासन्न होते त्यांना कुठलीही मदत मिळणार नाही, जखमींना लगेच औषधोपचार मिळणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली आणि नरसंहार जितका भिषण करता येईल तितका भिषण केला गेला. ह्याचे नावच् "डायर" नरसंहार झाल्यावर तो म्हणाला की ही सर्व जनता मारण्यासाठी सोपे होते. अनयास हजारोनी लोक उपस्थित होते, नि:शस्त्र होते आणि "Easy Targets" होते.
इतक्या मोठ्या प्रमाणात नरसंहार करण्यासाठी डायरला मोठा पुरस्कार देण्यात आला. त्या नरसंहारानंतर डायर ची ब्रिटिश पार्लमेंट ने तारीफ केली, रत्नजडीत मुठ असणारी तलवार भेट केल्या गेली आणि पुरस्कारादाखल आजच्या कित्येक कोटी रूपया मध्ये असणारी रक्कम देण्यात आली.
Easy Target - नि: शस्त्र हिंदू , सण उत्सवाच्या हर्षोल्लासात तल्लीन हिंदू - रामनवमी साजरा करणारा नि:शस्त्र हिंदू, हनुमान जयंती साजरा करताना नि:शस्त्र हिंदू. आनंदात मग्न नि:शस्त्र हिंदू म्हणजे Easy Target.
आताचे रामनवमीच्या शोभायात्रेवर झालेले भ्याड शांतीदूतांचे भ्याड हल्ले, हनुमान जयंती च्या पर्वावर झालेले हल्ले. ह्या हल्ल्यांमधली मेख म्हणजे हल्ला झाल्यानंतर मृत्युमुखी पडणार तो हिंदू चे रक्त सांडणार ही खबरदारी घेतली गेलेली. जो प्रकार जनरल डायर हत्याकांडात घडला, एका ही सरकारी पोलीसाचा जीव गेल्याबिगर हजारो शिख समुदाय मारल्या गेला.
"गोहत्या बंदी कायदा" आणण्याच्या वचनावर इंदिरा गांधी निवडून आल्या. ज्यावेळी "गोहत्या बंदी कायदा" लागु करण्यासाठी साधुसंतांनी निदर्शने केली गेली त्यावेळी १९६५ नि:शस्त्र साधुसंतांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी करपात्री महाराजांनी इंदिरा गांधी ला शाप दिला की कॉंग्रेस एक दिवस संपणार. हिमालयातून एक योगी येणार आणि तो कॉंग्रेस संपविणार. "कॉंग्रेस मुक्त भारत" हे त्याचे फलित. कॉंग्रेस सद्य अध्यक्ष हे नियतीने ठरविलेले कॉंग्रेस ला नेस्तनाबूत करण्याचे यंत्र. पण इंदिरा गांधी ने संतांची हत्या केली. निरपराध, नि:शस्त्र हिंदू संत गोळीबारात मारले गेलेत. Easy Target.
कोरोना काळात पालघर संतांची हत्या. नि:शस्त्र हिंदू संताला पोलिसाने शांतीदूत जमावांच्या स्वाधीन केले आणि लाठ्या काठ्या तलवारी, दगडांनीनी सज्ज शांतीदुतांनी हिंदू संताचा बळी घेतला. खुद्द पोलिसाने संताचा विश्वासघात केला नी संताला मरण्यासाठी स्वाधीन केला. Easy Target
राजस्थान मधील शंकराच्या मंदिराचे उच्चाटन करण्यात आले, ते देखील पोलिसांच्या देखरेखीखाली.
मध्यंतरी एक पोस्ट खुप जास्त व्हायरल झाली ती म्हणजे जालियनवाला बागेतील नरसंहारावर एका देशाने भारतीय पोलिसांवर संताप व्यक्त केला की एका ही पोलिसाने आपल्या बांधवावर गोळ्या चालविण्यापेक्षा जनरल डायर वर गोळी चालविली असती तर त्याचे परिणाम भारताच्या दृष्टीने फार प्रेरणादायी ठरले असते. मात्र भारतीय पोलिसांनी भारतीय नागरिकांवर गोळीबार करुन - दोन पैशासाठी, स्वतः चा स्वार्थ, स्वतः चे कुटुंबिय यांच्यासाठी देशाचे अहित, आप्त बांधवांचे अहित साधले.
१९१९ चा गोळीबार आणि आजचे आमचे पोलिस ह्यात आज देखील काही फरक पडला नाही.अन्यथा १९६५ मध्ये आमचे ६५ संत मेले नसते. पालघर ला आमचे संत शांतीदूत मंडळी च्या हत्थे चढले नसते.
आज आमच्या रामनवमी आणि हनुमान जयंती ला शांतीदूत मंडळी हमला करतात आणि षंढ पोलिस बघत बसतात. एका ही शांतीदूताला पकडून मारण्यास धजावत नाही.
उत्तर प्रदेशातील चित्र विपरीत आहे. संन्याशाच्या हाती सत्ता गेली तर निष्पक्ष पणे सरकार चालविणे म्हणजे काय असते हे आपल्या लक्षात येईल.
मात्र महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल, जिथे हिंदू लोकांवर अत्याचार होतो आणि पोलिस वर्ग शांतपणे हिंदू लोकांवर होणारे अत्याचार बघत असतात. ह्यातील एकसुद्धा हिंदू पोलिस हिंदू लोकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारावर बदला घेण्याच्या वृत्तीने किंवा हिंदू बांधवांना वाचविण्यासाठी धडपड करताना दिसत नाही. हिंदू पोलिस वरून मिळालेले आदेश पालन करताना दिसतात. होणाऱ्या राजकीय अत्याचारात सहभागी होताना दिसतात.
शांतीदूत आणि हिंदू मध्ये दंगा झाला तर निष्पक्ष पणे कारवाई करताना दिसत नाही. कितीतरी येणाऱ्या व्हिडिओ क्लिप्स दाखवितात की शांतीदूत हिंदू जमावावर हल्ला करताहेत आणि पोलिस मुक संमती ने काही न करता बघ्याची भुमिका घेताहेत. पालघरच्या पोलिसाने तर संताला मारेकऱ्यांच्या स्वाधीन केले. अशा पोलिसांना काय म्हणायचे? असे आदेश देणाऱ्याला काय म्हणायचे?
जो पर्यंत हिंदू पोलिस स्वतः हून हिंदू बांधवांवर होणारे अन्याय रोखणार नाहीत तो पर्यंत हिंदू बांधव असेच् Easy Targets बनत राहणार. हिंदू घटा देश बटा - अखंड भारतापासून आज आमचा लांबुळका भारत राहिला. आज देखील केरला, आसाम मधून स्वतंत्र देशाची मागणी उठते, देश विभाजन करण्याची मागणी येत आहे.
आज आमचे हिंदू पोलिस बांधवांनी निष्पक्षपणे हिंदू नागरिकांचा पक्ष घेऊन कारवाई केली तर पोलिस खरे रक्षक होतील. मात्र आज तरी पोलिसांची प्रतिमा दिसत नाही.
हिंदू पोलिस देखील जेव्हा राणा दांपत्यावर हनुमान चालीसा साठी "राष्ट्रद्रोहाचा" गुन्हा लावते त्यावेळी हिंदू पोलिसांची किव येते.
रामनवमी यात्रा, हनुमान जयंती वर शांतीदूत भ्याड हल्ला होतो, दगडफेक होते आणि हिंदू पोलिस बघ्याची भूमिका घेतात त्यावेळी पोलिसी षंढत्वाचा राग येतो.
अर्णव गोस्वामीला आवाज बंद करण्यासाठी पोलिस जबरदस्तीने गजाआड करतात तेव्हा हिंदू पोलिस खरेच् राजकारण्यांचे ओलिस ठेवले असतात ह्याचे वाईट वाटते.
आज जर हिंदू पोलिसांनी पारदर्शक रित्या कायद्याचे निर्वहन करित आपले कर्तव्य पार पाडले तर स्वार्थी राजकारणी आणि शांतीदूत समाजाची सिट्टीपिट्टी गुम होईल आणि राज्याराज्यांत स्वराज्य स्थापित होवून भारतात रामराज्य येण्यास विलंब होणार नाही असे वाटते.
मात्र पोलिसांमध्ये असा एकतरी आद्य क्रांतिवीर निपजायला हवा जो खंदा हिंदू आपल्या हिंदू पोलिसांना पारदर्शी कारवाई ची दिशा ठरवेल. आणि शांतीदूत समाजाला व्यवस्थितपणे वठणीवर वागण्यास भाग पाडेल.
©️भाई देवघरे
sadetod08@gmail.com
Tweeter @sadetod
Login to http://sadetod.com

232 

Share


भाई देवघरे
Written by
भाई देवघरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad