Bluepad | Bluepad
Bluepad
कन्या राशीं
R J Business Pune
R J Business Pune
13th May, 2022

Share

कन्या राशी
आज आपण राशीचक्रातील सहाव्या राशी बद्दल म्हणजे कन्या राशि बद्दल बोलणार आहोत कन्या राशीचे लोक ही दिसायला त्याच्या वयाच्या मानाने खूप लहान असतात थोडासा बालिशपणा यांच्या चेहर्‍यावर दिसतो कन्या राशी ही द्विस्वभाव राशी आहे म्हणजेच ह्यांची मत नेहमी बदलत असतात एका मतावर ठाम राहत नाही कारण नेहमी नवीन नवीन ज्ञान घेत असतात
आणि नवीन नवीन गोष्टींचा विचार करून त्यांची मते बदलत असतात आणि खूप जास्त विचार केल्यामुळे थोडे गोंधळलेले पण असतात द्विस्वभावी राशी असल्यामुळे त्यांच्या मनातलं किंवा मनातल्या गोष्टींचा थांगपत्ता ते कधीच लागु देत नाहीत म्हणजे जरा राजकारणी किंवा धूर्त वृत्ती असते म्हणजे आपण म्हणतो ना कोल्ह्यासारखी हि लोक चतुर असतात कन्या राशीची लोक दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी काढून घेणार पण स्वतःच्या मनाचा थांगपत्ता लागू देणार नाही अशी थोडीशी राशी आहे
तशी हि सत्त्व गुणाची राशी आहे म्हणजे त्यांचे चांगले विचार असता स्वच्छता नीटनेटकेपणा यांना आवडत असतो हि रास अति ज्ञानी रास आहे सखोल ज्ञान प्राप्त करायची इच्छा यांच्यामध्ये आहे ,हजारो प्रश्न यांना पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता इतके ज्ञान प्राप्त करतात कि लोकांमध्ये हे ज्ञानी माणूस म्हणून ओळखले जातात कन्या राशीचा स्वामी बुध आहे बुध म्हणजे व्यवहारीपणा आलाच कन्या राशी ची लोक कॉमर्स , बँकिंग अकाउंटन्सी अश्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात.
बुधामुळे व्यवहारीपणा येतो आणि त्यामुळे ही लोक पैशाच्या बाबतीत खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यामुळे अशी लोक शेअर मार्केटिंग मध्ये सुद्धा यशश्वी होऊ शकतात. पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा याचा ते खूप जास्त विचार करत असतात तर तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेला तर एखादी बाई खूपच जास्त बार्गेनिंग करत असेल तर समजून जा ती व्यक्ती हि कन्या राशीची असेल थोडक्यात काय तर अति व्यवहारी हि रास आहे अशी ही पृथ्वी तत्वाची राशी पृथ्वी तत्व म्हणजे हि लोक मोजकेच बोलतात
कन्या राशि ही पृथ्वी तत्वाची असल्यामुळे विचार करून बोलणारी हि रास आहे ह्या राशीचे लोक परंपरा जपून ठेवण्याचे काम करत असतात किंवा काही जुन्या गोष्टी आजोबांच्या जमान्यातल्या गोष्टी सुद्धा जपून ठेवायला कन्या राशी वाल्याना आवडतात कन्या राशीचा आणखीन एक गुण किंवा अवगुण म्हणू हवा तर ह्या राशीचे लोक खूप शंकेखोर असतात दुसऱ्या व्यक्तीवर कधीच लवकर विश्वास ठेवणार नाहीत आणि अति विचार करणारी हि रास आहे
जर समजा यांच्या पाण्याच्या टाकीजवळून उंदीर गेलाय असं कोणीही सांगितलं तरी या लोकांचा खूप पुढचा विचार करून झालेला असतो उंदीर आत पडला असेल का पाणी खराब झाल असेल का हे संशय मनात येत राहतात विचार करूनच पोटात दुखायला लागत ह्या लोकांच्याअति विचार केल्या मुळे जीवनाचा आनांद घेण्यापासून मात्र हि रास वंचित राहते ,
कन्यारास तशी हुशार व्यावहारिक ज्ञानी आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रॅक्टिकल अशी रास आहे परंत्तू अति विचार करण्यामुळे एखादी परिस्थती बदलली तर त्या परिस्तिथीमध्ये पटकन निर्णय घ्यायला हे गोंधळतात कारण यांना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करायची सवय असते म्हणून थोडीशी गडबड उडते यांची कन्याराशीचा अंमल हा जठार आणि लहान आतडे ह्यावर असतो
म्हणून तुम्हाला पोटासंबंधी आजार जास्त उद्भवू शकतात पोटदुखीचा त्रास जास्त होऊ शकतो कन्या राशीवाल्यांचा मंगळाच्या राशी वाल्यांशी अगदीच ३६ चा आकडा असतो मंगळाच्या राशी ह्या धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या तर कन्यावाले अति विचार करणारे असतात त्यामुळे ह्या दोन्ही राशी वाल्यांचे जरा कमीच पटते.

242 

Share


R J Business Pune
Written by
R J Business Pune

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad