Bluepad | Bluepad
Bluepad
स्त्रीत्वं
sanika
sanika
13th May, 2022

Share

*स्त्रीत्वं
स्त्रीत्वं
*
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्र देवता यतैतास्तू न पुज्यन्ते, सर्वास्तिजाफलाः क्रियाना
या संस्कृत ओळींनी तीला पुजनीय बनवलं म्हणजे तिची पुजा वगरे नव्हे! मुल्यांच्या कोणत्याही किंमतीला विकत न मिळणारा आदर आणि सम्मान म्हणजे स्त्रीत्वं आणि खरा या ओळींचा मर्म...
फक्त आई आणि ताई- पुरता आदर सम्मान म्हणजे स्त्रीत्वं होय का? तर विश्वातील कोणत्याही ही स्त्रीचा आदर सम्मान आई आणि ताईसारखा करणे म्हणजे स्त्रीत्वं...!
केवळ, व्हॉट्सॲप ,फेसबुकं टूिविटर, इंस्टावर स्टेटस, स्टोरी अपडेट करण्यापुर्ता महिला दिन कि केवल 8 मार्च या दिवसापुरता फक्त तिचा आदर करतोय या देखाव्यापेक्षा अंतरमनातून खरचं तिचा सम्मान करणं मोठं...
आज एकविसाव्या शतकातही
सुशिक्षित पिढीतही 'काय झाल, तर, मुलगी...!!! झाली हा वाक्यप्रचार रूढ झालेला दिसतो. त्याप्रमाणे वंशाचा दिवा होण्याचा आनंद व्यक्त केला जातो. तेवढाच आनंद वंशाची पणती झाल्यावर का होतं नाही ?
आज मुलाप्रमाणे मुलीलाही शिक्षणाची समान संधी आहे. मान्य आहे. तेही कायदयाने... पणतीला पेन आणि पुस्तकाबरोबरचं भांडी कशी घासवी हे देखील, शिकवण्याचा समाजाचा अठ्ठहास... पण मुलीने घासू नये असे म्हणायचं नाही... पण मुलालाही शिकवलं जावं ऐवढचं...!
घरची जबाबदारी का मुलांनाचं
शिकवली जाते. तिही मुलींला शिकवली जावी नं..! आज ती खाद्याला खांदा लावून पुढे जाऊ लागली नव्या नव्या क्षेत्रात पुढे जाऊ लागली. विकासाच्या प्रवाहात नावलौकीक स्त्रिया या बोटावर मोजण्याजोग्या आहेत. कारण, आजही सामान्य स्त्री चाकोरीबद्दंच आहे.
आभाळभर उडणाऱ्या पक्ष्यांसारखी स्वायत्वंता तिला असली तरी, पतंगाप्रमाणे तिच्या उडण्याची दोरी मात्र पुरुषप्रधान संस्कृतीच्या हाती आहे. हेही निर्विवाद सत्य आहे. सुशिक्षित समाजातही मासिक
पाळीच्या वेळी पवित्र अपवित्रतेच्या बंधनात अडकलेली दिसते. आपण त्याचं रक्ताच्या हाडामास्याच्या गोळ्यापासून आपण बनलोय याचा का विसर पडतोय, आपल्याला... या एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या छटा जरी पसरल्या तरी कोमार्य आणि कोमार्य चाचणीपर्यन्त तिलाचं डावललं जातं हि बाब वास्तव्यदर्शी आहे. देखाऊ आदराच्या वातावरणात वास्तव्याचे पडदे झाकले राहून जातात.
वैश्यावृत्तीच्या स्त्रीयांना गलिच्छ आणि अनादाराच्या वृत्तीने बघणार्या स्वता:ची हवस पूर्ण करायला तिच्याकडे जाणाऱ्या त्या पुरुषाच्या तोंडी तिच्याबद्दलची गलिच्छ भाषा कशी बरी शोभून दिसले? यावर विचार होण्याची गरज भासू लागते. इथे म्हणण्याचा उददेश प्रत्येक पुरुषाला नाही. केवळ': कृवृत्तीच्या पुरुषाला शब्द जोडले जातात.
वास्तव्यदर्शी चित्रणातून स्त्रीत्वं स्पष्ट होतं स्त्रीला पुरुषापेक्षा उच्च स्थान मिळावं अशी अपेक्षा नाही. अध्यक्ष बरोबरचं अध्यक्षिका शब्द प्रचलणात यावा बरोबरीचं स्थान मिळावं तेही अंतरमनातून... एवढेचं..!
महिला दिनासारखा एखादा पुरुषदिनही साजरा व्हावा. आमचा त्यातही उत्साहाने सहभाग राहील. एकट्या स्त्रीलाही पुर्णत्व नाही, आणि एकट्या पुरुषालाही नाही. पुर्णत्वं दोघातही आहे. आणि दोघामुळेही..! स्वामी विवेकानंद म्हणतातं...
There is no chance for The welfare
of The world
Unless the Condition of Women is improved. It is not possible for A BirdsTo fly on one Wing.
या एकविसाव्या शतकातही जोतिबा आणि
सावित्रीपेक्षा मोठं कुठलही उदाहरण होऊ शकत नाही. सावित्री घडली ती जोतिबामुळे हे निर्विवाद सत्य आहे. यात कुठलाही वाद नाही त्याचप्रमाणे...आजच्या पिढीने तिला उंच उडवण्याचं बळं तिच्या पंखांना दयायला हवं...
प्रत्येक यशस्वी पुरषामागे स्त्री असते,असं म्हणलं जाते. पण सावित्रीच्या यशामागे खंबीर जोतीबा होते. म्हणजे यशस्वी स्त्री मागे पुरुष नं...! तोचं जोतिबा आजच्या पिढीतील पुरुषांनी व्हावं आणि स्त्रीत्वातलं खरं स्त्रीत्वं शोधावं.
मुलीकडे मुलगी म्हणून बघ जरा
संधी नव्हे, जबाबदारीने वागं जरा
भरजरी शालूपेक्षा उठून दिसेल ती, सन्मानाच्या शालीने... कपाळी चंद्रकोरासारखा
स्वप्नांना आकार दे...
ओघळून पडेल अश्रू जेव्हा, हात खादयावर ठेव तिच्या, पुन्हा उठून लढेल ती,
जरा विश्वास ठेव.....
हिरव्याचुड्याहूनी हास्य उमटेल तिचे, जेव्हा घराकडे घेऊन येईल, श्रीफळ आणि बुके
झेप घेऊ दे... गगनी आसमंत ठेंगणे पडेल...
पखं आशेचे दे तिला...
नावलौकिक करेल...
नाकात शोभणाच्या मोत्यापेक्षा
शोभून दिसेल लेखणी तिची... हाती तिच्या पेन तर दे जरा...
होईल ती जोतिबाची सावित्री,
पण, आधी तिचा जोतिबा तर बनं जरा...!
आधी तिचा जोतिबा बनं तर जरा ..!
होईल ती तुझी सावित्री...📚🖋
विचार मनाचे...
सानिका डोईफोडे
(ता. कळमेश्वर जि.नागपूर)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
( नोट- वरील लेख कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतूने नाही...)

113 

Share


sanika
Written by
sanika

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad