आपल्या हिंदू संस्कृतीत पूजा पाठ यांना खूप महत्त्व आहे. दररोज सकाळी स्नान झाले की आपण पूजा करतो. भगवंताचे मनापासून स्मरण करून सर्व काही मंगल होवो अशी कामना करतो. पूजा केल्याने घरात सकारात्मकता आणि प्रसन्नता निर्माण होते. शास्त्रानुसार योग्य पद्धतीने पूजा कशी करावी आणि पूजा करताना नेमके काय करू नये हे जाणून घेऊया आजच्या लेखात!
तुळशीच्या पानांना करू नये स्पर्श -
विठ्ठल, कृष्ण यांच्या पुजेमध्ये तुळशीच्या पानांचे विशेष महत्त्व आहे. सूर्यास्तानंतर तुळशीचे पान तोडू नये असे शास्त्रीय विधान आहे. तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. संध्याकाळी झाडे विश्रांती करतात त्यामुळे सदैव ऑक्सिजन देणाऱ्या पवित्र तुळशीची पाने संध्याकाळच्या वेळी तोडू नये. खास करून संक्रांत, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करू नये. पुजेमध्ये तुळशीची वाळलेली पाने न वाहता ताजी पानेच देवाला वाहावीत.
संध्यासमयी कोणाचे पूजन करू नये -
पुराणात सूर्य पंचदेवतांचे संध्याकाळी पूजन करू नये असे सांगितले आहे. या पंचदेवतांमध्ये सूर्य, महादेव, विष्णू, गणपती, दुर्गा देवी या देवी देवतांचा समावेश होतो.
घंटा कधी वाजवू नये -
देवपूजा करताना आपण घंटा वाजवतो. घंटेचा नाद हा सकारात्मक प्रवृत्ती निर्माण करणारा असतो. घंटेच्या नादातून लहरी तयार होत असल्यामुळे मनात उत्साह आणि चैतन्य संचारते. पुराणातील उल्लेखानुसार, संध्याकाळच्या वेळी पूजा करताना किंवा देवासमोर दिवा लावताना घंटानाद करू नये असे सांगितले आहे. कारण संध्याकाळची वेळ ही वातावरणातील लहान लहान जीवांच्या झोपेत बाधा आणते अशी मान्यता आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर घंटानाद करणे टाळावे.
शंखनाद करून का मिळत नाही पूजेचे फळ -
प्राचीन काळात ऋषी-मुनी आपल्या पूजा-साधनेत शंखध्वनीचा प्रयोग करायचे. शंख वाजवल्याने त्याचा ध्वनी जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या सर्व बाधा, दोष इत्यादी दूर होतात अशी मान्यता आहे. शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊजा नष्ट करतो. शंख पूजाघरात ठेवणे आणि वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु संध्याकाळच्या वेळी देवी देवता विश्रांती करण्यासाठी जातात अशी मान्यता आहे. शंख ध्वनीने त्यांची विश्रांती भंग होऊ शकते. त्यामुळे सूर्यास्तानंतर शंख वाजवू नये असे सांगितले जाते.
संध्याकाळी पूजा करताना दिशा कोणती असावी -
सकाळी पूजा करताना आपले मुख हे पूर्व दिशेला असेल पाहिजे. तर रात्रीच्या वेळी पूजा करताना उत्तरेकडे मुख असावे असे म्हटले जाते. शिवशंभो शंकर यांचे निवास स्थान उत्तर दिशेला असल्याने या दिशेकडे तोंड करून केलेले पूजन फलदायी मानले जाते. त्यामुळे वैभवात वाढ होते. पुराणातील कथेनुसार कुबेराची दृष्टी सुद्धा याच दिशेकडे असते. ही दिशा स्थिरता दर्शवते.
इतर काही माहिती:
पूजा करण्ताना या सर्व गोष्टींचे पालन केले तर आपल्याला त्या पूजेचे उचित फळ मिळेल. तुम्हाला आणखी काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.