Bluepad | Bluepad
Bluepad
रात्र अर्ध्यावर सरत येते
ऋतुजा कुलकर्णी
ऋतुजा कुलकर्णी
13th May, 2022

Share

रात्र अर्ध्यावर सरत येते
तसा तो चंद्र ही हळू हळू खिडकीपाशी येतो
पडद्याआडून कानोसा घेत घरात डोकावतो
माजघरातील ती दिव्याची वात
आताशा मंद मंद होत जाते
गझल ऐकता ऐकता
एखाद्या शब्दापाशी येऊन मी विसावते
क्षणभरासाठी सारं काही थांबल्याचा भास होतो
आणि बहरलेल्या रातराणीचा दरवळ
मला तुझी आठवण देतो
तुझ्या आठवणींची आठवण काढताना
मन तुझ्यात चं अधिक गुंतत जाते
पापण्यांवर अधीन झालेली झोप
आताशा त्या चंद्रामध्ये उगा तुला शोधत रहाते...
ऋतुजा कुलकर्णी
रात्र अर्ध्यावर सरत येते

190 

Share


ऋतुजा कुलकर्णी
Written by
ऋतुजा कुलकर्णी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad