गोरे कोरे पाय तुझे
चिखलात माखले,
मळ्यात रोवत भात सारे
मी तुझ्याकडे पाहिले...
रूप तुझे मोहक सुंदर
जशी लोणी चाखावी
गरम चपाती वर,
हात चिखलाचा तरी तुझा
मातीत दिसे गोड दह्या सारखा...
कंबर तुझी लचकदार
मान तुझी डौलदार,
गुणगुणत ओठात गीत
भात रोवते रेषेत नक्षीदार...
हळवे तुझे मन किती
डोळ्यात दिसते सारे,
मी उभा बांधावर
तासभर पाहून
तुझ्या हसण्यात कळाले सारे...
-विकास कदम