Bluepad | Bluepad
Bluepad
सरळ आणि स्पष्ट वागणारी माणसे
shashi
shashi
13th May, 2022

Share

सरळ आणि स्पष्ट वागणारी माणसं , आहे त्याच परिस्थिती जे वास्तविक आहे, तेच मांडुन मोकळे होत असतात , मग समोरचा आपल्याला कुठल्या हेतुने संवाद साधत असावा. या गोष्टीचा विचार सुध्दा त्यांच्या डोक्यात दुर दुर प्रयत्न येत नसावा, किंवा त्या नंतर होणार्‍या परिणामाची चिंता ही त्यांना नसते.
आणि ही कुठलाचं मोह आणि स्वार्थ नसलेली माणसं, कुठल्याही वेळेत आणि कुठल्याही परिस्थितीत ते आपल जगणं कधीच बदलत नसतात, हव तर आजमावून पहावं अश्या माणसांना, ते तेव्हाही तसेच होतो आणि पुढेही तसेच असतात..
मग सध्या अंगावरचे कपडे आणि प्राॅफीट तथा स्वार्थ पाहून माणसांच्या जवळ जाणारी माणसं म्हणजे नुसता व्यवहारच,
पण ही निर्विकार, निस्वार्थ जगणारी माणसं जणू रिकामीच असतात डोक्याने, त्यांच साध सरळ जगणं दडलेल असतं ह्दयातुन ह्दया कडे.....
शशी केंद्रे___ ✍️

121 

Share


shashi
Written by
shashi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad