Bluepad | Bluepad
Bluepad
घरकोन - 42
Radhika  Kulkarni
Radhika Kulkarni
13th May, 2022

Share

घरकोन-42
©राधिका कुलकर्णी.
सगळी कामे लगबगीने उरकुन दोन वाजेपर्यंत रेवा पुर्णपणे रिकामी होऊन उन्मेशच्या फोनची वाट पहात होती.
बरोबर दोनचा टोल दिला घड्याळ्याने आणि फोनची रींग वाजली.रेवा अक्षरश: धावतच फोनजवळ पोहोचली. फोन उचलला पण समोरून सुश बोलत होता.
तिचा प्रचंड हिरमोड झाला.रोज लंच अवर्स मधेच सुश फोन करतो हे ही आज ती सबशेल विसरली होती.
नाईलाजानेच उसने हसु आणत तिने हॅलो केला.
"आटोपले का लंच?"
अगं लंच झाले का काय विचारतेस,मी काय जेवु हेच विचारायला तुला फोन केलाय."
आता मात्र रेवा जाम घाबरली,
"म्हणजे?"
"असे काय विचारतोस?डबा दिलाय मी तुला,घरीच विसरलास का?"
अगं माझे राणीऽऽ तु डबा दिलासऽऽ,मी ही न विसरता घेतला पण आत्ता उघडुन बघतोय तर तो रिकामाच आहे.मी काय डब्यातली हवा खाऊ का आता?"
सुशने जरा खोडकरपणेच तिला विचारले.
"अरेच्च्या!! हि काय भानगड झाली रे?
मी स्वत: डबा तुझ्या बॅगमधे ठेवला होता.असे कसे झाले?"
"आता हे तुलाच माहित कसे झाले,तुच शोध डब्यातले जेवण कुठे गेले ते,चल मी कँटीनमधे जेऊन येतो जरा.आल्यावर बोलतो."
रेवाला काहीच समजेना.काहीतरी विचार करत ती धावत किचनमधे गेली.किचनच्या ओट्यावर पण डबा दिसत होता.तिने घाईघाईने उघडला आणि बघते तर काय,सुशचा डबा किचनच्या ओट्यावर भरलेल्या अवस्थेत तसाच बसला होता.
अरे देवाऽऽ म्हणजे विचारंच्या तंद्रीत आपण दुसराच डबा बॅग मधे टाकला तर.
कालचा फोन झाल्यापासुन ती जरा तंद्रीतच वावरत होती त्याचाच परीणाम म्हणुन आज हे सगळे घडले होते.
रेवाला स्वत:वरच हसायला आले.
किती हा वेंधळेपणा.बिच्चारा सुश समजुन घेतो म्हणुन बरेय नाहितर आज रण कंदनच माजले असते.
पण हा का अजुन फोन करत नाहीये,त्याच्या नादात आज किती चुका घडल्या आणि ह्याचा पत्ताच नाही.
तेवढ्यात पुन्हा घंटी वाजली. हा फोन सुशचाच असणार,तिला माहितच होते.
तिने सवयीने हॅलो न म्हणताच सॉरी डिअर मी चुकुन तुला रिकामाच डबा दिलाय आज.अॅम सॉरीऽऽऽ! असे सगळे बोलुनच शांत बसली.
समोरून कोणीच बोलत नव्हते.
काय झाले फोन कट झाला की काय?मनाशीच संवाद करत असतानाच उन्मेशचा आवाज आला.
"काय घोटाळा केलात माते?"
"अरेच्च्या,तु आहेस होय,मी समजले सुशचा फोन."
"सॉरी हं चुकुन सुश समजुन तुलाच एक्सप्लनेशन देत बसले."
"हे असे कधी होते माहितीय?"
"असे!!!असे म्हणजे कसे?"
"असे म्हणजे,हेच डबा विसरणे,चुकुन एक समजुन दुसऱ्याशीच बोलणे इ. इ."
"कधी घडते?"
जेव्हा कुणाच्यातरी प्रेमात पडतात किंवा मग एखाद्या व्यक्तिचाच सतत विचार करत बसतो तेव्हा,काय रेवा मॅडम प्रेमात बिमात पडल्यात की काय पुन्हा?
सॉरी प्रश्न चुकला दुरूस्त करून विचारतो प्रेमा-बिमात पडल्या की काय माझ्या?
उन्मेशने पुन्हा एकदा आयत्या संधीचा फायदा घेत रेवाला चिडवायला सुरू केले.
"एऽऽऽ,काय हे,पुन्हा मस्करी?थकत नाहीस का तु चेष्टा करून?"
"अगं सिरीयसली विचारतोय.म्हणजे तुझा विचार बदलला असेल तर माझी हरकत नाहीये बर कां?"
"उन्मेशऽऽऽ,तु नाऽऽ,मला हसुन हसुन मारणारेस का?"
"बरं बाई,राहीले.तुझा इरादा पक्का आहे तर,म्हणजे आमचा नंबर नाहीये तर,चला बेटर लक नेक्स्ट टाईम."
"उन्मेशऽऽऽ बास ना आता,किती पकवतोस रे."
"तुझी मस्करी करून झाली असेल तर आपण बोलुयात का? "
"हंऽऽऽ...लागेच पत्ता कट का आमचा?असो..!!"
"अरे बाबाऽऽ, तु नंतर फ्लर्ट कर आधी ज्या कामासाठी फोन केलास ते बोलुयात का?"
"ओक्केऽऽऽऽ मॅम."
"बर सांग मग आता तु काल काय म्हणत होतीस?"
"अरे मला तुला अजुन बरेच काही सांगायचेय पण सगळेच फोनवर बोलणे शक्य नाही रे."
"तु असे करतोस का,बेंगलोरला येतोस का?"
"बेंगलोरला?आत्ता?"
"सध्या माझी जर्मनची टुर आहे ना ग नेक्स्ट विक, त्याचीच तयारी करतोय. त्यातच थोडा बिझी आहे.तिकडुन आल्यावर भेटुयात का??"
पण मग खूप उशीर होईल रे.आधीच खूप लेट झालेय खरेतर पण मी एकटीच काय करणार म्हणुन गप्प बसले पण आता वाटतेय लवकर हालचाल नाही केली तर काहीतरी अघटीत घडेल."
"काय अघटीत?"
"मी समजलो नाही."
अरे आता कसे सांगु,सुशच्या काकांना घशाचा कँसर झालाय.ते बेडवर पडुनच असतात हल्ली.त्यांचे फार दिवस नाही उरलेत रे आता.
काकुंना वाटतेय की सुशने एकदा तरी त्यांना भेटावे पण ह्याला काही पाझर फुटत नाहीये.सगळा ट्रीटमेंटचा खर्च सुशच करतोय पण भेटत नाही कुणाशी बोलत नाही.काय झालेय सुशला काय माहित पण ह्या बाबतीत तो माझेही ऐकेनासा झालाय.काकुंना वाटते की मी त्याला राजी करावे समजुन सांगावे पण काकुंना कसे सांगु ह्या बाबतीत तो कुणाचेच ऐकत नाहीये.मला खूप काळजी वाटतीय रे उन्मेश,जर काकांचे काही बरे वाईट झाले ना तर मग काकु सुशला कधीच माफ करणार नाहीत आणि मग सगळीच परिस्थिती हाताबाहेर जाईल.त्यानंतर मग मात्र ह्या दोघांना एकत्र आणण्याचे सर्व मार्ग बंद होतील.आत्ता निदान काकु तरी सुशशी बोलायला तयार आहेत पण नंतर जर काकुंनीच सुशला अव्हेरले तर मात्र गोष्टी कंट्रोलच्या बाहेर जातील. "
"हंऽऽऽ,सगळेच अघटीत चाललेय की तुमच्या कडे."
"पण सुशा इतका का बदललाय?"
"आधी फार हळवा होता गं तो.काकुंना हार्ट अॅटॅक आला तेव्हा त्याची स्थिती बघवत नव्हती.कसा बसा त्याला सावरला होता.तु ही होतीसच की.यु नो बेटर..
मग आताच इतका कठोर का बनलाय हा??"
मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडुन गेल्या आहेत रे."
"आता सगळेच इकडे सांगणे खुप अवघड आहे,म्हणुन म्हणतेय की तु एकदा प्रत्यक्ष भेट ते ही लवकरात लवकर.
"बर मी एक काम करतो, आज माझ्या सगळ्या कामाची लिंक बघतो आणि मग महत्त्वाची कामे पेपर्स रेडी करून एक दोन दिवसात भेटतो तुला.
पण मग सुशा समोर कसे बोलणार गं?"
हो म्हणुनच तु आल्याचे त्याला कळवुच नकोस डायरेक्ट घरी ये,आधी मला भेट,आपले सविस्तर बोलणे झाल्यावर सुशकडे जा.त्याला ऑफीसमधे भेटुन परत जा.वाटलेच तर वेळ असेल तर त्याच्या बरोबर पुन्हा घरी ये आणि मग जा,म्हणजे सुशलाही वाटेल की तु आत्ताच आलाएस..
"कशी वाटते आयडीया?"
"आईशप्पथऽऽ,प्लॅन तर ढासुच आहे.पण तुला सांगु हे म्हणजे कसे वाटतेय माहितीय, लग्नानंतर जे अफेअर्स करतात ना तसे काहीसे."
"असे चोरून भेट वगैरे जाम थ्रिलींग वाटतेय गं मला.जणु काही आपण सुशाच्या अपरोक्ष प्रेमात चोरून भेटी वगैरे..."
"एऽऽऽ,तु पुन्हा सुरू झालास ना?"
बावळटासारखे विचार करून माती नको हं खाऊस.कुठेतरी काहीतरी बोलुन पुर्ण प्लॅनची वाट नको लावशील अति उत्साहाच्या भरात."
नाही गं बाईऽऽ.मी गंम्मत करतोय.मला घटनेचे गांभिर्य आहे राणी.विल टेक केअर, डोण्ट वरीऽ."
आणि तुही नवऱ्याला अतिविचारात उपाशी नको पाठवुस.सुशाला संशय येईल बर आपल्या अफेअरचा."
"उन्म्याऽ तु जा आता..नाहीतर फोनमधे घुसुन मारीन मी तुला."
आेके आेके ..जातोऽऽऽ ..
बाय डिअर.टेक केअर.
घरकोन - 42
उन्मेशचा फोन संपला. आता खऱ्या अर्थाने तिच्या मनातील कृतीला आकार मिळण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडल्याचे हलकेसे समाधान रेवाला मिळाले होते.
पटकन देवघरात देवासमोर हात जोडुन सगळे ठिक होऊ दे अशी मुक मागणी देवाकडे करतच डोळे मिटुन नमस्कार केला तेव्हा एक वेगळीच मन:शाती लाभल्याचा अनुभव रेवाला मिळत होता.......
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-42
©राधिका कुलकर्णी.

162 

Share


Radhika  Kulkarni
Written by
Radhika Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad