काय हो आजोबा लहानपणी तुमच्या घरी टिव्ही मोबाईल नव्हता ना मग तुम्हाला करमतं कसे होते आम्हाला तर मोबाईल एक दिवस बंद राहिला तर काही तरी चुकल्या सारखं वाटतं एका नातीने विचारलं तेव्हा आजोबा म्हणाले अगं आमच्या काळात एका वाड्यात सगळे एकत्र राहत होतो रात्री उशिरापर्यंत जेवण झाल्यावर सगळे गोष्टी गप्पा मारत बसायचो घरात कोणाला अडचण आली तर सगळे आपलं समजुन एकमेकांना मदत करतं असे त्यामुळे जिवनात कितीही अडचणी आल्या तरी काही वाटत नसे आता कोणी एकत्र राहत नाही जो तो आपापल्या परीने वेगळा राहतो त्यामुळे काय होते कि सगळी घरची जबाबदारी एकट्याने पार पाडावी लागते कोण मदतीला नसते आणि तु म्हणते ना मोबाईल बंद असला कि करमतं नाही कारण आता प्रत्येक घरात माणसांची जागा मोबाईल फोन नी घेतली घरात आता चारच माणसं संध्याकाळी चार दिशेला तोंड नुसते घरात राहतात जेवण करत असतानाही मोबाईल फोन कोणाला काय अडचण बोलायला वेळ नाही मला कल्पना आहे तुम्ही बिजी आहे कामात पण आठवड्यात एक दिवस सुट्टी असते किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा एकत्र येऊन गप्पा मारल्या तरी जिवनात असलेल्या अडचणी ब-याच अंशी कमी होतील