निरोप तुमचा घेताना...
मोलाचे मार्गदर्शन देऊन
बनवलात आम्हाला शूर
मग हा निरोप देऊन का
करता हो आम्हाला दूर
तुमच्या सारखे गुरु
कधी भेटतील का मला
ज्यांच्या मध्ये असतील
तुमच्या सारखी कला
तुमच्या सहवासात
तीन वर्ष आम्ही घातले
पण आम्हाला दूर कराव
अस तुम्हाला का बर वाटले
कॉलेज मध्ये राहून
जीवनात रंग नवे भरले
पण आज या निरोपानेच
हे का बर सरले...
तुमच्यात दिसते आहे
जग मला सगळं...
पण या जगापासून
का करता आम्हाला वेगळं
कॉलेज मधून सोडून
कस जाऊ तुमची साथ
येणाऱ्या संकटा वर तुमच्या
शिवाय करता येईल का हो मात...
पाण्यासारखा रंग माझा
सगळ्यात मी मिसळतो
पण सांगाना सर या
निरोपानेच मी का कोसळतो...
कॉलेजेची हाक ऐकून
इथे आम्ही आलो...
पण आज निरोपानेच
का पोरके झालो...
माझ्या डोळ्यातून आज
अश्रूचा वाहून आला पूर
मग सांगाना सर ...
का करता हो आम्हाला दूर
लेखक - मंगेश ज्ञानेश्वर आदे ...🖋️💫
फोन - 9307260141