अस्तिकाची तेवढी भक्ती नास्तिक या भक्तीच्या भाव भावनेपासून दूर असतो का ? अस्तिकाकडे भक्ती अन नास्तिकाची या भाव भावनेशी काहीच ओळख, श्रद्धा निष्ठा नसते ? नास्तिक ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही. तो नाहीच असेत्याचे सततचे सांगणे असते. आस्तिक हेच नाकारलेल्या देवाचे अस्तिवाला आपल्या कल्पनेप्रमाणे आकार देतो इतकेच नव्हे तर त्या दिलेल्या आकाराला शंकर, विष्णू, राम, नृसिंह, श्रीकृष्ण, अशी नावे देउन त्यांच्या भक्तीत रंगतो. स्पष्टपणे देव निराकार असल्याचे सांगता सांगता नास्तिक काही पप्रमाणात त्याचे अस्तित्व नकळत स्वीकारतो काय हे पाहावे लागेल. देव आहे पण आणि देव नाही पण असा हा आस्तिक नास्तिकपणाचा मोहक खेळ देवच माणसाकडून खेळवून घेत आपल्या नावाची चर्चा सातत्याने इतकेच काय पदो पदी जागृत ठेवून त्याचे असलेले नसलेले अस्तित्व मनामनातून घट्ट रुजवत असावा. आपल्या अस्तिवावर दोघांनाही निष्ठा ठेवायला भाग पाडत असावा. देव नाही असे म्हणता म्हणता अशी काही मानवाच्या क्षमते बाहेरची घटना घडून जाते की नास्तिकाचे हृदयात निराकार देव आकार घेतो. एक कारखाना उभा करून कारखान्यातील मशीन ची निगराणी करायला अनेक विशेषज्ञाची गरज लागते पण शरीराचा हा कारखाना त्याची निगराणी एकटा परमेश्वर कित्येक
शतके विनातक्रार करत आहे. अत्यन्त गुंतागुंतीचे हे शरीर त्यात जीव भरून उभे करण्याचे कौशल्य पहिले की नास्तिकाला देवापुढे माणूस पालापाचोळा वाटायला लागतो. सगळ्यांना सगळे मिळते काही वेळा मागून आणि काही वेळा न मागता मग आपल्यालाच हा देव कर्म दरिद्री का ठेवतो. सारे करतो मी देवाचे, मनापासून देवाचे करतो. मग हा देव माझ्याकडेच का दुर्लक्ष करतो ? असा भाव निराषेतून अस्तिकाच्या मनी येऊन काही क्षण ईश्वराला नाकारण्याचा मोह या देवाच्या निष्ठावाला पडून जातो तेव्हा आहे रे, नाही रे असा भक्तीभाव दाटून येतो.
असणे आणि नसणे ही दोन्ही देवाची रूपे असावीत असे वाटून जाते. देवाचे अदृश्य होणे आणि देवाने भक्तांसाठी प्रगटणे या गोष्टी आपण वाचल्या आहेत. यावरून देव नास्तिकाच्या मागे अदृश्य रूपात असावा भले त्याने नाकारले तरी. जमिनीच्या मातीत एक बी आपण पेरतो तें जमिनीच्या अधीन होतं. रुजून जाते. तेच बीज जमिनीतून वृक्ष होऊन जन्मते. पण मूळ पेरले बी पेरणी आधी कितीही त्या बियाची फोड केली तरी संभाव्य वृक्ष आधी दिसणे कठीण.बी बियातून वृक्ष येतो हे सत्य. मग बी मधला वृक्ष आधी कसा दिसत नाही. असा काही वेळा अस्तिकाचे मनात प्रश्न येतो. या सर्वांचा अर्थ तिथे त्या बी मध्ये वृक्ष नाहीच असा कसा घेता येईल. बी मध्ये वृक्षाचे अस्तित्व असतेच तसे देवाचे आहे. आणि नास्तिकाचे ठायी असलेल्या भक्तीचे आहे. नास्तिकात भक्तीभाव नसतो मम्हणणे सर्वथा चूक.' जशी ऊसात ग साखर तसा देहात परमेश्वर. ' उसातील साखर आधी कुठे दिसते? जसे दुधात ग लोणी तसा देहात चक्रपाणी हा दुधात असलेला चक्रपाणी लोणी आधी दिसते? देव नाही हे विधान अर्धसत्य आहे पण मग देव आहे हे म्हणणे तरी पूर्ण सत्य आहे असे खात्रीने सांगता येईल?केवल तो दिसत नाही म्हणून देवाचे अस्तित्व नाकारणे कितपत योग्य. आणि निराकार देव आहे म्हणून आपल्या कल्पनेचे अस्तित्व त्याला बहाल करणे किती समर्थनिय?अस्तित्व असून नाकारले आणि तो कुठे असलाच तर. आणि देव आहे असे मानले तर आणि त्याचे अस्तित्व सिद्ध होईल असे काही घडले नाही तर ?
तूर्तास हा खेळ असाच चालू राहणार तो ही देवाच्या कृपेनेच. सध्या भक्तीभावे पूजावा देव हेच बरे.
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.