उंटचालक
एक रात्री शेकोटी जवळ बसले असता, तो उंटचालक सांगू लागला. मी अल कैरुम जवळ राहत असे. माझी स्वतःची बाग (शेती) होती. बायको, मुले होती आणि असे वाटत असे की आता यात मरेपर्यंत काही बदल होणार नाही. एका वर्षी उत्पादन भरपूर झाले आणि त्यावर्षी आम्ही मक्का यात्रा केली.
या यात्रेने आयुष्यातील एक कर्तव्य मी पूर्ण केले. आता मी आनंदाने मरू शकेन असे वाटत होते. पण एक दिवस भुकंप झाला, नाईल नदीला पूर आला पाणी किनाऱ्याबाहेर आले. मला असे वाटत असे की असे काही माझ्याबाबतीत घडणार नाही.
या पुरामुळे सर्व काही नष्ट झाले व मला जगण्यासाठी दुसरे काम शोधावे लागले व मी उंटचालक झालो. या संकटामुळे मला अल्लाहची जाणिव झाली व समजले की माणसाने संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवावी, घाबरून जाऊ नये. त्याने हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला काय हवे आहे व आपण ते कसे मिळवू शकतो.
आपण आपले सर्व काही गमावून बसू अशी आपल्याला भीती वाटत असते पण ही भीती त्यावेळी संपते जेव्हा आपण इतर लोकांचे जीवन बघतो व जगातील इतिहास पहातो. तेव्हा कळते की हे सर्व लिहिणारा हात एकचं आहे.