Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्रीचा आभास
Mansi Shinde
Mansi Shinde
13th May, 2022

Share

अडखळ होते बालपन
जेष्ठवतीचा मान तो
शिस्तीचा पहारा सदा पाठीशी
मैत्रीचा उणीव भाव तो
होऊनि किशोरी खळखळले
पुन्हा मोठेपणाचा आव तो
लहानग्यांच्या कास धरूनी
वडील धाऱ्यांचा धाक तो
तारुण्याला आली भरती
गवसला मैत्रीचा भर तो
उममेद जीवनाची कवेत घेऊनि
आनंदाचा मोहर तो.
काळ सरला स्वातंत्र्याचा
सुटला मैत्रीचा दोर तो
पाठवणी ती परक्या घरी
मनी दडपला मैत्रीचा आभास तो.

164 

Share


Mansi Shinde
Written by
Mansi Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad