Bluepad | Bluepad
Bluepad
अनुष्का आणि मारुती पाटील या बाप लेकिंची अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी
दत्तात्रय केरबा पाटील
दत्तात्रय केरबा पाटील
13th May, 2022

Share

कागल तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमा हद्दीत असणाऱ्या गलगले गावचे सुपुत्र श्री. मारुती गुंडू पाटील त्यांची मुलगी कु.अनुष्का मारुती पाटील यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याबद्दल गलगले ग्रामस्थांनी तोंडभरून अभिनंदन केलं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.खरोखर या गावाने अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात घडवले, श्री.मारुती पाटील व त्यांची कन्या कू.अनुष्का मारुती पाटील हे त्यातलेच एक.लहानपणी शिक्षण घेत घेत घरातील लोकांना शेतीतील आणि जनावरांच्या कामामध्ये ते मदत करायचे.त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गावच्या विद्या मंदिर गलगले, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लीश स्कूल (अताचे महालक्ष्मी हायस्कूल),लिंगनुर येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आणि स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करण्याची नवी उमेद व जिद्द असल्यामुळे काही वर्षांपूर्वी ते पुण्याला गेले.तिथे सुरुवातीला त्यांनी छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये हंगामी,कंत्राटी कामेसुद्धा केली.नंतर फावल्या वेळेत काहीतरी जादा करता यावे म्हणून त्यांनी रेडिओ आणि टीव्ही रेपीरिंगचा कोर्स केला.आता ते एक अस्सल पुणेकर झाले होते. मला आठवतंय मी एकदा पुण्यामध्ये गेल्यावर त्यांना भेटायला गेलो होतो.ते पुण्यातील वारजे एरिया मध्ये राहतात,आता गावकरी म्हटल्यावर आणि त्यातच मारुती पाटील यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ,आणि साधा ,संयमी असल्यामुळे त्यांनी आपुलकीने माझी चौकशी केली. निवांत जेवणाचा बेत करून बऱ्याच गप्पा मारल्या आणि मग आम्ही तिथून त्यांची रजा घेतली. मारुती पाटील यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांच्या पत्नींनीही मोलाची साथ दिली.काही वेळेला संसारात बरेच चड उतार आले कष्ट आले, छोटी मोठी संकटे अडचणी आल्या पण आपल्या नवऱ्याबरोबर त्या खंबीरपणे न डगमगता तटस्थ उभ्या राहिल्या.मारुती पाटील यांना नाटकांची खूप विलक्षण आवड,नाटक पाहायला जाताना ते अनुष्काला कायम सोबत न्यायचे.नाटक पाहून आल्यानंतर अनुष्का आरशासमोर नाटकातील वेगवेगळ्या पात्रांची भूमिका करायची आणि आपल्या वडिलांनाही शिकवायची.यातूनच अनुष्का शाळेमध्ये आणि इतर ठिकाणी स्पर्धामध्ये भाग घेऊ लागली. तिची अभिनयातील कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कौशल्य हेरून वडिलांनी तिला ती चार वर्षांची असताना तिला अभिनयाच्या क्लास ला घातले.त्यावेळी अनुष्काने भालभा केळकर करंडक स्पर्धा आणि ज्ञानदेवी बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट बालनटीची बक्षिसे मिळवली.तीचे बाबा तिला बऱ्याच अभिनयाच्या ऑडिशन्स साठी घेऊन जायचे, तिच्या शाळेकडून ही तिला मौलिक सहकार्य मिळाले आणि अजूनही मिळत आहे.आकांक्षा बालरंगभूमी येथे बळूमामाच्या नावानं चांगभलं या प्रसिद्ध मालिकेतील साऊ भूमिकेत असणाऱ्या चैत्राली रोडे या अनुष्काला गुरु म्हणून लाभल्या.तिने आतापर्यंत बालनाट्य स्पर्धा, शॉर्ट फिल्म,वेबसिरीस,मराठी चित्रपट ब्लँकेट सिन,कोण होईल महाराश्ट्राचा कॉमेडीचा सुपरस्टार, सतीश तारे स्मृती करंडक स्पर्धा इत्यादी स्पर्धेत सहभाग घेवून आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली.चैत्राली रोडे यांनी मारुती पाटील यांना सुद्धा सावधान इंडियामध्ये संधी देवून त्यांच्याही अभिनयाची सुरुवात करून दिली.त्यानंतर या दोघा बाप लेकिनी कोण होईल महाराश्ट्राचा कॉमेडीचा सुपरस्टार मध्ये शिक्षक आणि विद्यार्थिनी चा दमदार अभिनय करून आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडली. कोरोनाच्या अतिभयानक संकटावेळी पुणे सोडायची अवस्था झाली होती, पण अनुष्काच्या अंगी असणाऱ्या गरुड भरारी अभिनयामुळे पुणे सोडवस वाटत नव्हत. त्यावेळी भावांनी आणि सर्व वहिनींनी मोठा मायेचा आधार दिला.मारुती पाटील यांनीही सावधान इंडिया,जीव झाला येडपिसा,घेतला वसा टाकू नका,काशीबाई बाजीराव बल्लाळ यासारख्या मालिकांमध्ये आपल्या सुंदर भमिका बजावल्या.सगळ्यात सोनेरी क्षण म्हणजे श्रीगणेश लिखित,दिग्दर्शित व निर्मित जिव्हारी या चित्रपटात या दोघा बाप लेकिना अभिनयाची सुवर्ण संधी मिळाली.या भूमिकेसाठी श्रीगणेश चव्हाण व कास्टींग डायरेक्टर श्री हरीश भोसले सर यांनी निवड केली.हा जिव्हारी चित्रपट येत्या 20 मे रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.तरी सर्वांनी हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहावा अशी आशा करतो...यानिमित्ताने अनुष्का आणि तिचे वडील यांचा जीवन प्रवाह खरोखर आदर्शवत आहे. या बाप लेकीनी अभिनय क्षेत्रात अजून देदीप्यमान यश संपादन करून उंच भरारी घ्यावी हीच सदिच्छा...धन्यवाद.
लेखन : दत्तात्रय पाटील, गलगले.
अनुष्का आणि मारुती पाटील या बाप लेकिंची अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी

179 

Share


दत्तात्रय केरबा पाटील
Written by
दत्तात्रय केरबा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad