Bluepad | Bluepad
Bluepad
पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक...👌*
omkar deogade
omkar deogade
13th May, 2022

Share

*पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक...👌*
*आवर्जून वाचावे*
पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक...👌*
👇
*एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.*
*अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....*
*या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढुन टाकलं आणि त्या* *आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं .*
*याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली*
*आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली*
*याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं*
*याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला....*
*त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे !*
*जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले*
*शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!*
*आणि शेवटी त्यांनी लिहिले ..….*
*"खरच, किती वाईट* *आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!*
*इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली.*
*भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकड पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला.*
*सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला*
*आणि काही न बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या.*
*थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता.*
*तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला.*
*लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली.*
*त्यात लिहिले होते ..*
*गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते* *पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले.*
*आता मला कुठलाही त्रास नाही.*
*मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!*
*याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय* *यशस्वीरित्या पार पाडली.*
*आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो,*
*आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!*
*याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले..!!*
*याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं,*
*जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला*
*आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने* *लागला ....!!!*
*आभारी आहे देवा ...!!*
*किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..!!"*
*बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!!*
*नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!*
*आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.*
*आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.*
*प्रत्येक घटनेला जसा* *कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.*
*आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!*
*त्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु,*
*सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका.*
*जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!!*
*जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!*
*Every Dark cloud has a silver lining …!!!*
*प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!!*
*शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे, आपल्या विचारांवरच ठरणार आहे.*
*आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!*
*दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!*
*शेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात….!!*
*पेला अर्धा सरला आहे*
*असं सुद्धा म्हणता येत;*
*पेला अर्धा भरला आहे*
*असं सुद्धा म्हणता येत!*
*सरला आहे म्हणायचं*
*कि भरला आहे* *म्हणायचं?*
*सांगा कसं जगायचं?*
*कण्हत कण्हत*
*कि गाणं म्हणत*
*तुम्हीच ठरवा....!!*
*सकारात्मक व्हा ....आनंद लुटा..!!*
🙏🙏🙏

188 

Share


omkar deogade
Written by
omkar deogade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad